गडचांदूर शहरात वार्ड न,6 मध्ये घराला भीषण आग,, संपूर्ण घर जळून खाक

0
188

गडचांदूर : मोहन  भारती
पिंपळगाव रोडवरील वार्ड न,6 मध्ये राहणाऱ्या देवराव कल्लुरवार यांच्या घराला मध्यरात्री 1,30 च्या सुमारास अचानक आग लागली, आगीने क्षणात रुद्र रूप धारण केले, शेजारच्या नागरिकानी तसेच नगरसेवक रामा मोरे,आग विझविण्यासाठी प्रयत्न केले,तसेच घरातील महिलांना, बालकांना घराबाहेर काढले,त्यानी पोलीस स्टेशन ला माहिती दिली,
ठाणेदार गोपाल भारती यांनी तात्काळ माणिकगड सिमेंट व अल्ट्रा टेक सिमेंटच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलीवल्या,अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले,
या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले, देवराव कल्लुरवार यांचे अंदाजे 7 ते 8 लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज आहेत,
आज सकाळी पटवारी व पोलिसांनी पंचनामा केला, सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज आहे,
या आगीची झळ शेजारीच असलेल्या धनंजय चांदेकर यांच्या घराला सुद्धा लागली,त्यांचे सुद्धा नुकसान झाले आहेत,
,,,,,,,,,
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्ष कडून मदत,,
या आगीत कल्लुरवर यांचे संपूर्ण घर जळल्यामुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू नष्ट झाल्या,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद जोगी यांनी पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली तसेच जीवनावश्यक वस्तू व किराणा पुरविला,व मदत केली,
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here