पत्रकार जयंत जेनेकर यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन

लोकदर्शन प्रतिनिधी

कोरपना :

कोरपना येथील दैनिक लोकमतचे शहर प्रतिनिधी जयंत जेनेकर यांची पत्नी सौ. प्रतिभा जयंत जेनेकर (बोबडे) यांचे सोमवार, 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता अकाली निधन झाले. चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांना प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांना मुलगी झाली. मात्र या आनंदाच्या क्षणीच त्यांच्यावर काळाचा आघात झाला. मागील काही दिवस त्या आजारी होत्या. मेडिकल व्यावसायिक जयंत दिलीप जेनेकर यांचा मागील वर्षीच विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here