वेतन वाढीबाबत कामगारांचा आक्रोश अनावर, अल्ट्राटेक,अंबुजा, एसीसी – सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन..

वेतन वाढीबाबत कामगारांचा आक्रोश अनावर,

अल्ट्राटेक,अंबुजा, एसीसी – सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन..

नांदाफाटा प्रतिनिधी : रविकुमार बंडीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक,अंबुजा,एसिसी सिमेंट कंपनीत मागील काही वर्षात स्थायी कामगार सेवा निवृत्त होत असल्याने स्थायी कामगारांच्या कामाचा ताण हा कंत्राटी कामगारांवर पडत असून कंपनीतील स्थायी वेज बोर्ड कामगारांच्या ठिकाणी कंत्राटी मधील कुशल अंर्धकुशल,अकुशल कामगारांकडून कमी वेतनात काम करवून घेण्यात येत असल्याने कामगार वर्गात तीव्र आक्रोश निर्माण होत असल्याचे पडसाद मागील काही महिन्यात कामगारांनी केलेल्या आंदोलनावरून कळते सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांचे मागील काही महिन्यापासून वाढीव वेतन बाबत कंपनी व्यवस्थापनाशी वारंवार निवेदन देऊन या संदर्भात कामगार आयुक्त नागपूर यांच्याशी चर्चा करताना कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नसल्याने चर्चा निष्फळ होत असल्याने कामगारांमध्ये आक्रोशता निर्माण असल्याने अखेर आज संयमाचा बांध फुटला आज अल्ट्रतेक आवरपूर येथील कामगारांनी कंपनीतील सर्व मशिनरी यंत्रणा बंद पाडत अखेर सिमेंट प्लांट बंद केला आहेत विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सर्व कामगारांनी एकत्रित होऊन प्लांट मधे ठिय्या मांडला असून वाढीव वेतना संदर्भात तोडगा निघत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा कामगार संघटनेने घेतला आहेत.

*आंदोलनाला आमदार सुभाष धोटे यांची भेट,व्यवस्थापनाला न्याय मागण्या सोडविण्याच्या सूचना*

(कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन स्थळी आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणुन घेतल्या, कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडविण्याच्या कंपनी व्यवस्थापनाला सुचना केल्या. यावेळी अंबुजा सिमेंट कंपनीचे कमर्शियल हेड सुब्बू लक्ष्मण, एच. आर. अनिल वर्मा, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, गडचंदुरचे ठाणेदार शिंदे, गडचांदूर चे नगराध्यक्ष सविता टेकाम, अभय मुनोत, आशा खासरे, आशीष देरकर, शैलेश लोखंडे, कामगार प्रतिनिधी सुनील ढवस, दशरथ राऊत, कोरपणा तहसीलदार पी ऍस व्हटकर ठाणेदार शिंदे कंपनी व्यवस्थापन चे प्रतिनिधी नामीत मिश्रा, नारायणदत्त तिवारी, सतीश मिश्रा व कामगार उपस्थीत होते.)

आता ही आर पार ची लढाई – शिवानी वड्डेटीवार

दरम्यान सायंकाळी विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वद्देट्टीवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली मागच्या दहा महिन्यांपासून सर्व कंत्राटी कामगार आपल्या अधिकार नाय मागण्यासाठी पगार वाढीसाठी विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत मात्र कंपनी व्यवस्थापन पगार वाढीसाठी तयार दिसत नसून फक्त आणि फक्त बाहाने करून वेळ मारून घेत आहेत त्यामुळे आज विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात एसीसी,अंबुजा,अल्ट्राटेक येथील सर्व कामगार त्या त्या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलन करीत आहेत ही आर पार ची लढाई असून पगार वाढीचे सेटलमेंट झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतल्या जाणार नसल्याचे बोलताना अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला इशारा दिला आहेत यावेळी अंबुजा, एसीसी, अल्ट्रटेक येथील विजय क्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

*अशा आहेत मागण्या*

(ठेकेदारी कामगाराला २६ दिवस काम देण्यात यावे
कुशल,अर्धकुशल,व अकुशल कामगारांना श्रेणी नुसार १४०,१४५,१५० पगार वाढ करण्यात यावी
वेज बोर्ड करमाच्याच्या ठिकाणी ठेका श्रमिकांना ही वाढ सोडता बाकी व्यतिरिक्त प्रत्येक दिवसाला २०० रुपये वाढ देण्यात यावी
२०२१ ला कंपनी व्यवस्थापनाने कबूल केल्यानुसार २ जोडी कपडे देण्यात यावे
महिला व सर्व ठेका कामगारांना २६ दिवस कामाची हमी देण्यात यावी
नवीन ठेकेदारी कामगारांना ३५० रूपये मजुरी मिळत आहेत त्या ठिकाणी वाढवून ५०० रुपये देण्यात यावा
नवीन ठेकेदार कंपनी मधे नव्याने रेगुलर करून नये
जसे की कामगारांना कंपनी कडून सांगण्यात आले होते की पंचींग साठी १५ मिनिट जास्त दिले होते ते लागू करण्यात यावे
१८/१२/२०२१ ला आठ दिवस कामगारांनी ठिय्या आंदोलन होते व्यवस्थापन व विजय क्रांती कामगार संघटने मधे जो समझोता झाला होता त्याला अमलात आणावे
अशा प्रकारच्या कामगार संघटनेच्या मागण्या आहेत)

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *