Home
Home Breaking News गडचांदूर शहरातील: बंद उड्डाणपुलाच्या विरोधात गडचांदूर येथील व्यापारी व नागरिकांचे रस्ता रोको...

गडचांदूर शहरातील: बंद उड्डाणपुलाच्या विरोधात गडचांदूर येथील व्यापारी व नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️व्यापारी असोसिएशनचा सक्रिय सहभाग.

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा ते गोविंदपूर राष्ट्रीय महमार्गचे बांधकाम जोरात सुरू असून काही ठिकाणी रत्ता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. गडचांदूर येथील राजीव गांधी पेट्रोल पंप चौकासमोरून ते रावी पेट्रोलपंप पर्यंत बंदिस्त उड्डाणपूल चे बांधकाम होणार आहे. संविधान चौक बसस्टॉपवर येथे दोन्ही रस्त्याला जाण्या येण्याकरिता २५ मिटर चा बोगदा तयार होत असल्याने गडचांदूर शहराचे दोन भाग होणार आहे. क्रांतीवीर बाबुराव शेडमाके चौक येथे बोगदा होणे आवश्यक आहे परंतु संपुर्ण उड्डाणपूलमध्ये वाहतुकीसाठी एकच बोगदा होत आहे.
गडचांदूर शहराची मुख्य बाजार पेठ याच रस्त्यावर बसलेली आहे. त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर होणार आहे. गडचांदूर येथे आधीच बसस्थानक नाही आणि आता बंदिस्त उड्डाणपूल होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शहरातही उड्डाणपूल रद्द करण्यात यावे किंव्हा उड्डाणपूल बंदिस्त न करता खुले ठेवण्यात यावे याकरिता शहरातील व्यापारी मंडळांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांचे निवदन दिलेले होते. परंतु उड्डाणपूल संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. उड्डाणपूलच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने शहरातील व्यापारी व नागरिकात असंतोष पसरला आहे.
म्हणून आज शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगा लागल्या. आंदोलनात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गडचांदूर पोलीस मोठा बंदोबस्त ठेवला. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी चव्हाण यांना निवेदन देऊन शासनाकडे आपली मागणी पाठविली आहे. आंदोलनानंतर पोलसांनी वाहतूक खुली केली.

उड्डाणपूल होत असल्याने शहराचे दोन भाग होणार आहे. त्यामुळे ते बंदिस्त होत असल्याने नागरिकांना खूप त्रास होणार असल्याने उड्डाणपूल चे बांधकाम बंदिस्त न करता खुले ठेवण्यात यावे.

सविता टेकाम
नगराध्यक्ष, न. प. गडचांदूर

पेट्रोल पंप ते शेडमाके चौक या रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. बंदिस्त उड्डाणपूल होत असल्याने व्यापारावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे खुला उड्डाणपूल बांधण्यात यावा याकरिता व्यापारी मंडळाने लोकप्रतिनिधी ला निवेदने दिलेली आहे. बंदिस्त उड्डाणपूल रद्द झाले नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल.

हंसराज चौधरी
अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, गडचांदूर
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here