57 वर्षीय शिक्षकाचा सहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

by : Shankar Tadas
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी 57 वर्षीय नराधम शिक्षकाला नुकतीच अटक केली. त्याने आपल्याच शाळेतील सहावीच्या विद्यार्थिनीवर मागील अनेक महिने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी संजय विठ्ठल पांडे (57) हा गणिताचा शिक्षक असून कामगारनगर, जट्टेवार सभागृहामागे राहणारा आहे. त्याने सदर मुलीवर शाळेतील प्रयोगशाळेत अत्याचार करून तिला कुठेही वाच्यता करू नकोस म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली होती. 57 वर्षीय या शिक्षकाने बारा वर्षीय आपल्याच विदयार्थीनीवर मागील चार -पाच महिन्यापासून अत्याचार करूनही शाळेच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 5 एप्रिल रोजी पीडित मुलगी घरी आली असता तीने त्रास होत असल्याचे आईला सांगितले. सविस्तर विचारले असता ही घटना उघडकीस आली. आईच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.

#nagpurcrimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here