सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने दिला जाहीर पाठिंबा…*

 

लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात
दि. १५ मार्च २०२३

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली बंद करते वेळेस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन सरकारला सांगितलं होतं की, वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे.जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा आम्ही आपल्या सोबत आहोत असे आशयाचे पत्र वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, चंद्रकांत खरात, नाझिरहुसेन झारी यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here