वालुर रस्त्यावर दुचाकिला अपघात, तरुण शेतकऱ्याचा म्रुत्यु * सेलुला माळव्याच्या बिटासाठि जात असतांना घडला अपघात

 

लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी

वालुर येथील तरुण शेतकरी आसाराम उर्फ अशोक बंडु जइद वय (३२ वर्षे) माळव्याच्या बिटासाठि सेलुला जात असतांना अपघात घडुन म्रुत्यु झाला.हि घटना दि.१३ मार्च सोमवार रोजी सकाळी ६ वाजण्याच्या पुर्वी वालुर-सेलु रस्त्यावर डॉक्टर बंगाली यांच्या शेताजवळ पुर्वेस ३ किमि अंतरावर घडली. आसाराम ऊर्फ अशोक बंडु जइद वय (३२) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. नेहमी प्रमाणे ते शेतातील भाजीपाल्याच्या बिटासाठि वालुरहुन त्यांच्या होंडा ड्रिम युगा मोटारसायकल क्रमांक MH २१ बिके १६९६ वरुन सेलुकडे जात होते. दरम्यान डॉक्टर बंगाली यांच्या शेताजवळील रोडवर त्यांच्या मोटारसायकलला अपघात होऊन आसाराम जइद हे गंभीर जखमी झाले.रस्त्यावरुन येणाऱ्या एका शेतकऱ्याने अपघाताची माहिती लोकप्रतिनिधी मनिष कदम यांना दिली.राहुल कांबळे हे तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले.अति रक्तस्त्राव झाल्याने आसाराम जइद यांचा म्रुत्यु झाला.मर्त्यदेहाचे श्ववविच्छेदन सेलु उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंधारे यांनी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंधारेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक हिंगे हे करत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परीवार आहे. आसाराम जइद यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळवळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here