Home
Home Breaking News मलेशियातील जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रा प्रशांत खैरे यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन*

मलेशियातील जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रा प्रशांत खैरे यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन*

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
======================

गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ आणि डॉ आंबेडकर वेल्फेअर असोसिएशन,मलेशिया द्वारा आयोजित दुसरे आंबेडकर वादी साहित्य संमेलन क्वालालांपुर, मलेशिया येथे दि4 आणि 5 फेब्रुवारी2023 ला आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात प्रा. प्रशांत खैरे यांच्या “मला श्वास घेता येत नाही”या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी दातू पंजामुर्ती (वरिष्ठ पत्रकार,आंबेडकरी विचारवंत) संमेलनाध्यक्ष डॉ उत्तम अंबोरे, डॉ.प्रकाश करमाडकर पुणे ,डॉ.के पी वासनिक दिल्ली, प्रा.दिपककुमार खोब्रागडे ( अध्यक्ष ,जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर), प्रा.डॉ विलास तायडे ,प्रा.डॉ अनिल काळबंडे,प्राचार्या डॉ वैशाली प्रधान म्याडम (मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद) राजकुमार तिरपुडे ,प्रो डॉ हेमचंद दुधगवळी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. प्रशांत खैरे हे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे इतिहास विभागाचे प्राध्यापक असून आपल्या कविता व साहित्याच्या माध्यमातून ते शिव, फुले,शाहू, आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या अनेक वास्तववादी, समाज प्रबोधनपर,विद्रोही कविता रसिकांच्या पसंतीस उतरल्या, अनेक कवितांना विविध साहित्य समूहा द्वारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नुकताच त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र द्वारा राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जागतिक स्तरावर प्रा प्रशांत खैरे यांच्या “मला श्वास घेता येत नाही”या कविता संग्रहाची दखल घेऊन प्रकाशन केल्याबद्दल परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे प्रकाशन करण्यामध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे सदस्य तथा आंबेडकरी विचारवंत प्रो डॉ हेमचंद दुधगवळी यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here