लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील बुद्ध भूमी च्या सर्वांगीण विकासासाठी खासदार निधीमधून 40 लाख रुपये देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी बुद्धभूमी गडचांदूर येथे आयोजित केलेल्या धम्म ध्वज समारोह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिली,
पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था च्या वतीने जागतिक धम्म ध्वज दिन कार्यक्रम आयोजित केला होता,प्रमुख पाहुणे म्हणून अशोक घोटेकर,भुपेश थुलकर, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे,विजय आगलावे,गौतम तोडे,राजुभाऊ जंगम,प्रभाकर खाडे, सिद्धार्थ पथाडे, गौतम धोटे,गीता साखरे,राजू भगत,जयप्रकाश कामडे उपस्थित होते,याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गौतम भसारकर,किशोर डोंगरे,प्रकाश भसारकर,चंद्रमनी उमरे,दशरथ डांगे,पौर्णिमा भसारकर,मंजू हस्ते,आशा सोंडवले, करुणा धोटे,संघा ताकसांडे,सुनंदा पाटील,सीमा खैरे,शीला निरंजने, शशिकला उमरे,रेखा वाघमारे, भारती वाघमारे, तेलंगणा राज्यातील मधू बावलकर, हिरीशन गेडाम,भीमराव चापले, उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन भानुदास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्पा मोरे यांनी केले.
Home Breaking News बुद्धभूमी च्या विकासासाठी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करणार,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ,,केंद्रीय राज्यमंत्री...