Home
Home Breaking News जनजागृती सेवा समिती ग्रुप सदस्यांचे नविन वर्षातील काव्यमय संकल्पना आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता...

जनजागृती सेवा समिती ग्रुप सदस्यांचे नविन वर्षातील काव्यमय संकल्पना आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहीनीवर सादर

 

लोकदर्शन बदलापूर👉 -गुरुनाथ तिरपणकर

मुंबई-२०२३या इंग्रजी नविन वर्षाचे सर्वच देशवासीयांनी जल्लोषात स्वागत केले.त्याच अनुषंगाने जेष्ठ नागरीकांसाठी काही नविन संकल्प,काव्यमय संकल्पना मंगळवार दि.०३/०१/२०२३रोजी सायंकाळी ६.३५वाजता “अमृतकलश”या विशेष कार्यक्रमात मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहीनीवरुन सादर करण्यात आले.या कार्यक्रमात जनजागृती ग्रुप सदस्या कवियत्री सौ.सुरेखा गावंडे,वृत्तपत्र लेखिका सौ.माधुरी भोईरकर यांनी आपले संकल्प व काव्यमय संकल्पना सादरी केली.तसेच जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी नविन वर्षातील संकल्प विशद केले व नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी श्री.अनिलकुमार पिंगळे सर व निर्मिती सहाय्यक सौ.हर्षदा प्रभु मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here