



लोकदर्शन पवनी👉.अशोक गिरी
पवनी -४जानेवारी :- अषित प्राथमिक शाळा पवनी येथे देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १९२वी.जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जिवनावर अप्रतिम अशी भाषणे, गिते तसेच ओव्या सादर केल्या.मध्यानानंतर सर्व विद्यार्थ्यांना मसाला भात कढी,जिलेबी सह भोजन देण्यात आले.यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारची लोकजागृतीपर व मनोरंजनात्मक नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून चिवडा, समोसा व सोनपापडी पार्सल देण्यात आली व सामुहिक वंदे मातरम् घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.डी.भोयर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके,विजुमाला साखरकर,करुना वाघमारे, धनश्री मुंडले, प्रमिला बिसने तथा शालेय विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला शहरातील नागरिक, पालक वर्ग यांची बहुसंख्य प्रमाणात उपस्थिती होती हे विशेष!