Home
Home सामाजिक आटपाडी मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी...

आटपाडी मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या वतीने व युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने संपन्न

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

श्रीराम बहुउदेशीय सेवाभावी यांच्या वतीने
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कला व विज्ञान महाविद्यालय व श्रीराम ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 13 ऑगस्ट रोजी सध्या जम्मू कश्मीर येथे सैन्य दलात कार्यरत असणारे श्री महादेव गळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी त्यांचा सत्कार कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिनांक 14 रोजी वीर पत्नी श्रीमती फुलाबाई सुरेश चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांचा सत्कार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भारती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक संतोष सावंत यांनी मानले.त्यावेळी सर्वजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here