सामाजिक उपक्रमांनी आदर्श शिवभूमी शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 8 ऑगस्ट
सामाजिक उपक्रमांनी आदर्श शिवभूमी शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांची द्वितीय पुण्यतिथी चिरनेर येथे साजरी करण्यात आली.खारपाटील गुरुजी यांना वाचनाची आवड होती. वाचाल तर वाचाल हा सल्ला ते विद्यार्थ्यांना नेहमी देत असत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी चिरनेर, पनवेल, नेरे, खालापूर, म्हसळा, पोलादपूर, दापोली येथील वाचनलयाना दोन लाख रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली. याचबरोबर चिरनेर येथील आश्रम शाळेला कपाट भेट दिले
पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात अध्यात्मिक पोर्णिमा मंडळ यांच्या हरीपाठाने झाली.उपस्थित सर्वजण हरिपाठात दंग झाले होते.रात्री भजनसम्राट जयदासबुवा पंडित यांच्या सुश्राव्य भजनात श्रोते तल्लीन झाले होते.
पुण्यतिथी ला उद्योजक पी पी खारपाटील, उद्योजक राजाशेठ खारपाटील, रायगडभूषण प्रा एल बी पाटील, उरण तालुका शेकाप चे विभाग चिटणीस रमाकांत म्हात्रे, उरण तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष पद्माकर फोफेरकर,सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार तांडेल शिवसेना ग्राहक संरक्षण दलाचे उरण तालुका उपप्रमुख शशांक ठाकूर, अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मुलन चे प्रमुख विद्याधर ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे सदस्य हरिचन्द्र भगत, उरण तालुका भाजपा नेते रमेश फोफेरकर भजनबुवा हरिचन्द्र गोंधळी, तुर्भे हायस्कूल चे मुख्याध्यापक आत्माराम मांडवकर , हरिपाठ चे दत्ता मोकल आणि गोपाळ डुनगीकर, स्वाध्याय परिवार चे मधुकर फोफेरकर आणि दीपक गोरे, लायन्स क्लब उरण चे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पत्रकार तृप्ती भोईर, दर्शना माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.गुरुजींची तिन्ही मुले , सुना, खारपाटील आणि नारंगीकर परिवार, खारपाटील गुरुजींचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजी ना आदरांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here