गॅस्ट्रो निर्मुलनासाठी गावागावात जनजागृतीची आवश्यकता. — शंतनु धोटे.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

प्राथमिक आरोग्य केंद्र, देवाडा येथे युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट : उपाययोजनांचा घेतला आढावा.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा देवाडा येथे गॅस्ट्रोच्या साथीने ४ रुग्ण दगावल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी युवक काँग्रेस शिष्टमंडळासह भेट दिली. येथे मोठ्या संख्येने भरती असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. तातडीने स्वास्थ्यविषयक उपाययोजना न केल्याने हा प्रकार उद्भवला आहे. तेव्हा त्वरीत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सुचना या शिष्टमंडळाने केल्या आहेत. तसेच सदर गॅस्ट्रोची साथ देवाडा येथून स्थानिक परिसरातील सोंडो, लक्कडकोट, सिध्देश्वर, टेंबुरवाही, पाचगाव व अन्य ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे. गॅस्ट्रो साथीच्या निर्मुलनासाठी प्रभावी उपाययोजना तसेच गावागावात यावर जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिली आहे.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहेमद, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, माजी प स सदस्य अब्दुल जमीर, उपसरपंच अब्दुल जावेद, देवाडा सोसायटी अध्यक्ष शंकर बोनकुर ,डॉ. अहिरकर, डॉ उदेला यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here