सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदुरच्या अध्यक्ष पदी डॉ.आनंदराव अडबाले तर सचिव पदी नामदेवराव बोबडे यांची अविरोध निवड…

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदुर: –
येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदुरच्या कार्यकारणी मंडळाची आज झालेल्या निवडणुकीत सर्वानुमते अध्यक्ष पदी डॉ.आनंदराव अडबाले तर सचिव पदी श्री. नामदेवराव बोबडे तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री.तुळशीराम पुंजेकर सहसचिव म्हणुन श्री.विनायकराव उरकुडे तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून श्री.नोगराज मंगरुळकर, श्री.माधव मंदे, श्रीमती. नलिनिताई डोहे, श्रीमती.उज्वलाताई चांदेकर, श्री नारायणराव झाडे. यांची अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकार म्हणून श्री. चंद्रकांतजी गोहोकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. शशांक नामेवार यांनी निवडणूक पार पडली. अविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिका ऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या संस्थेअंतर्गत सुरू असलेले गडचांदुर येथे शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय (कला, विज्ञान, व व्यवसाय ), सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल, तसेच पेल्लोरा येथे संजय गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय (कला, विज्ञान व व्यवसाय ), आणि कोरपना येथे स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी विद्यालय म्हणुन कार्यरत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here