दिनांक ०२ जून २०२२ लोकसत्ता मध्ये आलेल्या विरोधी पक्षाची दशा आणि दिशा या अगदी अभ्यासात्मक लेखावर माझं मत…

 

लोकदर्शन👉 किरण कांबळे

1. या पूर्वी असे बहूमत काँग्रेस कडे सुद्धा होते पण इतके उघड पणे गैरसंविधनिक शासन ते करीत नव्हते म्हणजेच BJP ला बहुमताचा गर्व होऊन ते असे करतील असे वाटत नाही असं या लेखात लिहलेले आहे.

–> काँग्रेस सरकार हे ८० च्या दशकात बहुमतात होते आणि तेव्हा बहूमत असणं आणि ते टिकवण तितकंच गरजेचं होते.
परंतु आत्ता बहुमत २०१४ ला EVM मधून मिळाले आणि त्याला टिकवण्यासाठी सुद्धा EVM आहे तर मग सत्ताधाऱ्यांना भीती कसली???
ते त्यांच्या सोई नुसार सरकार आणतात आणि बदलतात, जसे की EVM वर जेव्हा अविश्वास दाखवला जातो तेव्हा काही ठिकाणी ते आप आणि काँग्रेस ला सत्ता देतात आणि उत्तर प्रदेश सारखं मोठ राज्य स्वतःच्या ताब्यात ठेवतात.
जेणे करून हे पटवून देता येईल की, जर आम्ही घोटलेच करीत असतो तर काही राज्यात आप आणि काँग्रेस ची सत्ता नसती आली…
परंतू हे फक्त समाजाला भ्रमात ठेवून EVM वापर रहावा या साठी आहे कारण त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत आहे की EVM हे एक असं माध्यम आहे ज्या मधून
भारतीय लोकशाही ला लोकशाहीच्या मार्गाने संपवता येईल.

२. विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी??

–> विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला हुकूमशाह होण्या पासून वाचवू शकते ही या लेखातील सुंदर ओळ आहे.
परंतू वास्तव फार भयानक आहे…
आज सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मध्ये एक प्रकारे समझोता झाला आहे आणि ते आळीपाळीने सत्ता उपभोगत आहेत असेच दिसून येते.
काँग्रेस त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेत होते त्या वर अमल बजावणी करण्याचे काम BJP करताना दिसत आहे. आणि सध्या तर कोणाचं हिंदुत्व सर्वश्रेष्ठ या वर सत्ताधारी BJP आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात शर्यत चालू आहे.
या देशात मध्ये तुम्ही आम्ही मतदान करू तर शकतो परंतू देशात येणारे सरकार हे काँग्रेस किव्वा BJP यांचेच बदलून बदलून येऊ शकते त्या वर सध्या तरी पर्याय त्यांनी ठेवलेला नाही.
लोकशाही टिकवायला सक्षम विरोधी पक्ष गरजेचं असतो आणि हे दोघं एकाच माळेचे मणी आहेत हे आत्ता लोकं मध्ये पसरत चालल्याने यातून समाजात विद्रोह होऊन तिसरा फ्रंट जर उभा राहिला तर यांच्या आळीपाळीच्या सरकार ला समस्या होतील म्हणून त्यांनी त्यांच्यातीलच एकाला म्हणजे आप ला जे की RSS चे एक पिल्लू आहे त्याला राष्ट्रीय पातळीवर प्रचारात आणले आहे.
आज सत्ताधारी त्यांचे काम ईमानदारी ने करत नाही म्हणून विरोधी पक्षाने जनतेचा आवाज बनणे गरजेचे आहे.
परंतु विरोधी पक्ष जनतेच आवाज बनत नसल्याने लोकांना त्यांच्या मुद्द्यांसाठी स्वतःहून रस्त्यावर उतरावे लागत आहे.
आज शेतकरी, विद्यार्थी, वकील, doctor, इंजिनियर, रिक्षाचालक, बस चालक, शिक्षक, व्यापारी, पालक, आदिवासी, महिला, बेरोजगार, युवा, कर्मचारी, स्पर्धा परीक्षा देणारे, कंत्राटी कामगार, PHD चे शिक्षण घेणारे यांना लॉकडाऊन मध्ये गाईड ऊपलब्ध करून दिले जात नव्हते काही ठिकाणी त्यांना पाहिजे असलेला सामजिक विषय त्यांना घेऊ दिला जात नव्हता, या समस्या साठी हे सर्वच जण त्यांच्या हक्क अधिकार साठी रस्त्यावर उतरून लढत होते आणि आहेत, त्यांना सुद्धा दडपण्याचे काम होत आहे, त्यांच्या वर लाठी चार्ज होत आहे, त्यांना जेल मध्ये टाकले जात आहे.
हे सर्व विरोधी पक्ष गप्प असल्याचे परिणाम आहेत आणि लोकशाही ला होत असलेल्या धोक्याचे लक्षण सुद्धा आहे.

३. नॉन issue ला issue करून जनते समोर आणणे असे या पेपर मध्ये नमूद आहे.

–> लोकांना त्यांच्या वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यामधून जो काही वेळ मिळतो त्या वेळेत ते जिल्यातील, राज्यातील, देशातील घडामोडी पाहतात.
ते पाहण्याचे साधन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया.
रात्री ७ ते १० च्या मध्ये ज्या बातम्या, प्राईम टाईम, हल्लाबोल, डिबेट दाखवल्या जातात त्या वर दुसऱ्या दिवशी कामावर जाताना ट्रेन बस मधील प्रवासात चर्चा होतात, office मध्ये लंच टाईम मध्ये आणि घरी परतीच्या प्रवासात सुद्धा त्याच विषयांवर चर्चा होतात.
मग या चर्चा काय असतील हे ठरवणे याच इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या हातात आहे.
सध्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सरकार चे दलाल झाल्या मुळे पत्रकारिता न करता चाटूकरीता केली जाते त्या ज्या आमच्या समस्या च नाहीत त्या वर
रात्री ७ ते १० च्या मध्ये बातम्या, प्राईम टाईम, हल्लाबोल, डिबेट घडवले जातात.
या मधून आमच्या मूळ समस्या पेक्षा जाणीवपूर्वक ज्या आमच्या समस्या नाहीत त्यांना समस्या वर आमची मानसिकता बनवण्याचे काम केले जाते.
कदाचित हे सुद्धा सरकार द्वारे नियोजित चालवले जाणारे कार्यक्रम असावेत…
या मधून काही गोष्टीवर परिणाम होतो, तो म्हणजे जनता अंधारात राहते आणि सत्ताधारी त्यांच्या चुकीच्या धोरणाला कायम ठेवते, जनते मध्ये विद्रोह होत नाही, जातीय धार्मिक तेढ निर्माण होते.
आज आम्हाला अन्न वस्त्र निवारा सोबतच शिक्षण , स्वास्थ, रोजगार, रस्ते, पाणी, वीज या सोइंची आवश्यकता आहे.
आज आमच्या समस्या वाढती महागाई आहे, मग ते पेट्रोल डिझेल चे भाव असतील किव्वा भाजी पाल्याचे भाव असतील, आज सुशिक्षीत बेरोजगार यांचे प्रमाण वाढत आहे ही आमची समस्या आहे, आज शेतकरी सोबत विद्यार्थी आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे ही आमची समस्या आहे, स्पर्धा परीक्षेचे गाजर दाखवून वर्षानुवर्ष भर्ती प्रक्रिया पूर्ण न करणे ही आमची समस्या आहे, आज गाईच्या सुरक्षेवर जेवढा आवाज उठवला जातो तेवढा आवाज महिला सुरक्षा वर दिसत नाही ही आमची समस्या आहे, लोकशाहीचे ४ स्थंभ आज ब्राह्मण नियंत्रणाच्या अधीन आहेत ही आमची समस्या आहे.
जे एकट्याने लढतात अश्या समस्या ग्रस्त लोकांना ती त्यांची वैयक्तिक समस्या वाटते आणि ते आत्महत्या चा मार्ग अवलंबतात ही आमची समस्या आहे.

आमच्या बहुजन समाजाची सगळ्यात मोठी समस्या ही आहे आम्हाला आमच्या या खऱ्या समस्या माहीत नाही, हीच काय ती आमच्या बहुजनांची समस्या आहे…
आणि म्हणूनच कोणी आम्हाला भोंग्यात अडकवते तर कोणी हनुमान चालीसा मध्ये.
कोणी आम्हाला पाकिस्तान आमची समस्या आल्याचे सांगते तर कोणी मुसलमान समजा मुळे हिंदू खतरे मध्ये आम्हाला सांगते.
वरील सर्व आमच्या खऱ्या समस्या या तर परिणाम आहेत आणि परिणामांवर काम करू फायदा नाही जो पर्यंत या परिणामांच्या कारणांचा बंदोबस्त होणार नाही.
या परिणाम रुपी समस्या मागे कारण आहे ती म्हणजे या देशातील व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचा हतियार आहे EVM
आणि म्हणूनच जर आजच्या घडीला आमची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे EVM…

४. श्रीलंका मधील परिस्थिती भारतात येऊ शकते का?

–> अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि मीडिया यांच्या विरोधात जनमत तयार होणे गरजेचे आहे.
जे श्रीलंका मध्ये घडले त्याचीच तयारी जनआंदोलनं च्या रूपाने BAMCEF गेली ४० वर्षा पासून करीत आहे.
भारतात हा विद्रोह श्रीलंका पेक्षा मोठा असणार आहे आणि तो BAMCEF च्या मार्गदर्शन ने आणि BKM BMM बॅनर खाली मा. वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वानेच होईल.
सध्या आपण जे काही धरणा आंदोलने, जेल भरो, भारत बंद आणि रॅली प्रदर्शने करतो आहे ही सर्व आंदोलने जनते मध्ये हा विद्रोह निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे.
४० वर्षापूर्वी या जन आंदोलनाचे रोपटे BAMCEF ने लावले होते त्याचे रूपांतर आज भल्या मोठ्या वृक्षात झाले आहे.
ज्या वेळी हा विद्रोह सर्व सामान्यांचा विद्रोह बनेल आणि मोठा होईल तेव्हा नक्कीच श्रीलंका पेक्षा मोठे आंदोलनं भारतात BAMCEF व्दारे झालेले दिसेल…

Conclusion :
*आपण काय केले पाहिजे?*
सध्या सरकार आपले नाही, विरोधी पक्ष आपले नाहीत, न्यायपालिका वर सुद्धा ब्राह्मण वर्गाचा कब्जा आहे, मीडिया सुद्धा त्यांच्याच ताब्यात आहेत.
अशा परिस्थिती केवळ संविधान आपल्या बाजूने आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारे हे संविधान विरोधी आहेत.
त्या मुळे जन आंदोलन हाच एक पर्याय आहे आणि त्या साठी सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि यांना नियंत्रित करणारे ब्राह्मण यांच्या विरोधी जन मत बनवणे गरजेचे आहे.
ते बनवण्या साठी जनतेमध्ये जाऊन या गोष्टी पटवून देणे गरजेचे आहे.
लोकशाही केवळ मतदान करून बोटाला शाही लावून टिकट नसते तर ती टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कारण या देशाला क्रांती नंतर प्रतिक्रांती चा इतिहास लाभलेला आहे.
त्या मुळे ही संविधान रुपी क्रांती आपल्याला टिकवावी लागेल कारण प्रतिक्रांती ची तयारी करणारे आज सुद्धा त्यांचे काम ईमानदारी ने करीत आहेत.

आज समाजातील जाणकार लोकांना NOTA ला मतदान केले आणि राजकारण वाईट आहे आणि त्यात सामन्याने पडू नये असे केले म्हणजे या संविधान विरोधी व्यवस्थेचा विरोध केला असे वाटते.
खर बघितल तर यातून च खरा सत्यानाश होतो कारण लायक लोकं राजकारण कडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच नालायक लोकं सत्ते मध्ये जाऊन राज करतात…

जर ते नॉन issues ला issue बनवून बहुजन समाजाची दिशा भुल करीत असतील तर आपण त्यांच्या पर्यंत जाऊन त्यांना त्यांच्या समस्यांची जाणिव करून देणे गरजेचे आहे.

लायक नेत्रुवाचे काम असते की त्याने समाजातून लायक घडवले पाहिजेत आणि तसं न करणारे नेत्रुव हे केवळ नालायक असतात आणि समाजाची दिशाभूल करतात…

धन्यवाद…

*योगेश श. थोरात*
*प्रदेश अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *