आम्ही पिरकोनकर समूहाद्वारे रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि ५ जून विविध सामाजिक कार्यामध्ये सातत्यपूर्ण काम करणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाद्वारे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ मे रोजी पंचरत्न इंग्लिश मेडीअम स्कूल, पिरकोन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी मिशन वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रक्त केंद्र कामोठे यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. रक्ताची सर्वाधिक गरज असणाऱ्या या काळात एकूण ५६ पुरूष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना समूहाच्यावतीने प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

शिबिराच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यास मोहन कोंगेरे लाईफ वर्कर रयत शिक्षण संस्था, अनंत गावंड चेअरमन पंचरत्न विद्यालय, मंगेश म्हात्रे माजी सरपंच, रमाकांत गावंड, विनायक गावंड उपस्थित होते.जिवन गावंड माजी जि.प.सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जितेंद्र पाटील, संकेत पाटील, अजित म्हात्रे या शरीरसौष्ठवपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पिरकोन गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक मंगल गावंड यांनाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरास साई संस्थान वहाळचे प्रमुख रविशेठ पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले. सोमनाथ गावंड, परिसरातील अनेक मान्यवरांनी या सामाजिक व आत्यंतिक गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

दिवसभरातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर सर यांनी आपल्या विशेष शैलीत केले. शिबिराचे यशस्वी आयोजन होण्यासाठी आम्ही पिरकोनकर समूहाचे चेतन गावंड, तुषार म्हात्रे, मनोहर पाटील, प्रमोद पाटील, विनय गावंड, सुरेंद्र गावंड, प्रणित गावंड, सिद्धेश गावंड व एम.जी.एम. रुग्णालय स्टाफने मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here