पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र तसेच किर्लोस्कर विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण वाचवा अभियानांतर्गत जनजागृती पर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.आज संपूर्ण विश्वापुढे पर्यावरण विषयक अनेक समस्या आ वासून उभ्या असताना पर्यावरणाविषयी प्रबोधन आणि जनजागृती करणे,त्याच बरोबर आपल्या अवतीभवती अवघ्या जगामध्ये जाणवणाऱ्या निसर्गा विषयीच्या समस्यांचे निराकरण करणे आणि पर्यायाने पर्यावरण रक्षण करणे ही काळाची गरज ओळखून पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने पर्यावरण वाचवा अभियान सायकल रॅली काढली. पर्यावरण विषयक प्रबोधन करणारे विविध संदेश फलक सायकल ला लावून पलूस पासून क्रांती स्मृतीवन बलवडी या ठिकाणापर्यंतजाऊन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, क्रांती स्मृती वनाचे निर्माते भाई संपतराव पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली.बलवडीचे क्रांती स्मृतीवन निसर्ग व पर्यावरणाचे एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून आज ओळखले जाते. त्याच बरोबर क्रांती स्मृती वनात दादांच्या व रॅलीत सहभागी पर्यावरण प्रेमी तसेच सायकल प्रेमी सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करणेत आले. पर्यावरण रक्षणा विषयी भाई संपतराव पवार, मारुती शिरतोडे, दिनेश बडगुजर व प्रिया महेश पाटील यांनी आपले विचार मांडून भविष्यकाळात पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रत्यक्ष करावयाची अंमलबजावणी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर सायकल चालवा, आरोग्य सांभाळा ,प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा .आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त ठेवा. या गोष्टीचा स्वतः अंगीकार करणे व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे आवाहन या रॅलीत करण्यात आले .सदर रॅलीत ज्येष्ठ मार्गदर्शक दिनेश बडगुजर ,आदित्य माळी ,सतीश पाटील ,महेश पाटील, कृष्णा केसकर ,वरदराज मलमे ,नैतिक मदने ,प्रिया पाटील ,आर्या मलमे, अखिलेश पाटील, धनुष पाटील यांच्या सह अनेक सायकल प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला .या अभियानाचे संपूर्ण नियोजन शिवाई प्रबोधन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिम्मतराव मलमे सर यांनी केले व अभियानातील सहभागी सर्वांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *