कोरपना येथील प्रतीक बोरडे बनला नायब तहसीलदारl

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर चा माजी विद्यार्थी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोरपना येथील प्रतिक गजाननराव बोरडे यांची नायब तहसीलदार पदी निवड झालेली आहे .गेल्या चार वर्षापासून त्याने जळगाव येथे अभ्यास करून व कोरोना काळात कोरपना येथील मिशन सेवाअभ्यासिकेत अभ्यास करत लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांना तो पुढे गेला आणि जाहीर करण्यात आलेल्या निकालात त्याने घवघवीत यश संपादन केले आहेत.त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळा कोरपना येथे व माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालय,कोरपना ,उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ,वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पुर्ण केले त्याचे वडील स्व. गजाननराव बोर्डे हे वसंतराव नाईक विद्यालय कोरपना चे माजी मुख्याध्यापक / तथा संस्थापक संचालक होते.तो माजी मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय ठावरी यांचा साळा असुन त्यांनी त्यास मोलाचे मार्गदर्शन केले.त्याने जिद्द,चिकाटी,नियमित अभ्यास करून यश संपादन केले.त्याने आपले यशाचे श्रेय आई श्रीमती कलावती ,ताई सौ.माधुरी, नातलग व स्टुडंट्स फोरम ग्रुप चे सहकारी सदस्य तसेच निलेश मालेकर ( राज्य कर निरीक्षक ) व अनिल देरकर (पोलीस उपनिरीक्षक )व कोरपना नगरवासियाना दिले आहे.
प्रतिक ने संपादन केलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here