Home
Home पुणे शिवाई प्रबोधन वाचनालय पलुस च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

शिवाई प्रबोधन वाचनालय पलुस च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

लोकदर्शन 👉 राहुल खरात


*⭕स्मृती शताब्दी वर्षा निमित्त विविध उपक्रम राबवण्याचा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचा संकल्प**

आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड संचलित शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस या ठिकाणी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्लामपूर शहर वाहतूक पोलिस विभागाचे पोलीस निरीक्षक मा. अशोकराव जाधव यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून छत्रपती शाहूंच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी विक्रम शिरतोडे व विशाल शिरतोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक राज्य सरचिटणीस तथा शिवाई प्रबोधन वाचनालयाचे प्रवर्तक हिम्मतराव मलमे यांनी केले तर आभार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील दलवाई यांनी मानले. या कार्यक्रमास ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य सल्लागार आदित्य माळी,एस.एन. पाटील,पी.एस.पाटील, डॉ.संतोष देसाई ,अथर्व माळी,वरद मलमे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here