चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्‍या उत्‍थानासाठी पतंजली योगपीठने पुढाकार घ्‍यावा – आ. सुधीर मुनगंटीवार


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕हरीद्वार येथे आचार्य बाळकृष्ण यांची घेतली भेट*

चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी तसेच आदिवासी बांधवांनच्‍या उत्‍थानासाठी पतंजली योगपिठ हरीद्वार यांनी पुढाकार घ्‍यावा व चंद्रपूर जिल्‍हयात विविध उपक्रम राबवावे, अशी विनंती विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आचार्य बाळकृष्‍ण यांना केली.

दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हरीद्वार येथे पतंजली योगपीठ ट्रस्‍टचे महासचिव आचार्य बाळकृष्‍ण यांची भेट घेतली. यावेळी वरील विषयाच्‍या अनुषंगाने चर्चा करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्‍या आयुष्‍यात समृध्‍दी व संपन्‍नता निर्माण व्‍हावी यादृष्‍टीने पंतजली योगपीठ ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन उपक्रम राबविले गेल्‍यास त्‍यांचे जीवनमान उंचावेल तसेच आर्थिक प्रगती देखील होईल. या प्रक्रियेत पंतजली योगपिठ ट्रस्‍टला आम्‍ही सर्वतोपरि सहकार्य करू असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

या विषयासंदर्भात निश्‍चीतपणे योग्‍य विचार करण्‍यात येईल, पंतजली योगपीठ ट्रस्‍टची चमू लवकरच चंद्रपूर जिल्‍हयाला भेट देईल व याबाबत सकारात्‍मक पाऊले उचलली जातील असे आश्‍वासन आचार्य बाळकृष्‍ण यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here