सवित्रीबाईफुलें विद्यालयात तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे ,राष्ट्रीय मतदार दिवस साजरा। करण्यात आला।

लोकदर्शन 👉 मोहन भारती।

गाडचांदूर ÷राष्ट्रीय मतदार दिवस हा भारतीय मतदारासाठी तसेच नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशात होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावी हा उद्देश समोर ठेऊन सावित्रीबाई फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर ,येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी मतदारांच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन शारीरिक शिक्षक श्री वासेकर सर यांचेसह सर्वांनी केले.
आपल्या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे खरे प्रतिनिधित्व देशापुढे येईल मतदारांचे केवळ एक मत प्रतिनिधित्व बदलू शकते म्हणून भारतातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण भागात मतदानाविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सुशिक्षित व शिकलेल्या लोकांनी व शिक्षकांनी जाणीवपूर्वक करावी असे विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी मांडले .
सदर कार्यक्रमाला शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here