वर्ध्या जवळ झायलो पुलावरुन कोसळून भीषण अपघात; सातजण जागीच ठार, मृतांमध्ये

लोकदर्शन 👉 मोहन भारती.

●आमदारपुत्राचाही समावेश

●हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झालाय
देवळी ÷सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदार पुत्रही यात मरण पावलाय.

पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली. त्याने वर्धेकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here