कोरपना येथे एसटी चालक-वाहकाचा सत्कार

By : Shankar Tadas

कोरपना : कित्येक दिवसांनी गरीबाचा रथ, आपली लाडकी लाल परी कोरपण्यात दाखल झाली. लोकांना आपल्या जिवाभावाच्या सखीला भेटल्याचा आनंद झाला. याप्रसंगी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक यांचा सत्कार शनिवारी कोरपना बस स्थानक परिसरात करण्यात आला.
याप्रसंगी कोरपना येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठीत नागरिकांनी लाल परीचे स्वागत केले. यावेळी ब्रदर्स ऑन ड्युटीचे दिनेश राठोड, दिलीप मडावी, खुटेमाटे सर, पत्रकार प्रमोद गिरडकर, संतोष मडावी आदी उपस्थित होते. चालक सतीश खडसे व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सेवा कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कोरपना ते चंद्रपूर दरम्यान पूर्ववत परिवहन सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, कर्मचारी यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. त्याबद्दल एसटीचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here