सोनूर्ली येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रच्या लेकीचा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम चे आयोजन।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा, या अभियान अंतर्गत वेषभूषा स्पर्धा व इतर स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले,
कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य शरद जोगी होते,तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष यादव खिरवटकर,सदस्य अरविंद डाखरे,अरविंद वासाडे,बावणे मॅडम,पारखी उपस्थित होते,सर्वप्रथम पाहुण्यांनी मा जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या स्पर्धेत पुर्व माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सृष्टी बावणे द्वितीय क्रमांक तन्वी सोनपितरे,तृतीय क्रमांक जानवी घागे यांनी पटकिवला,माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मोनाली मालेकर,व नंदिनी चामाटे,द्वितीय क्रमांक समीक्षा कुचनकर,शर्वरी वासाडे,स्नेहा खिरवटकर,तृतीय क्रमांक प्रिया डाहूले यांनी पटकीवला,
उच्च माध्यमिक विद्यालय मधून प्रथम क्रमांक पूनम तेलंग हिने मिळविला,
प्रदीप वरारकर व चमूने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला,वर्ग 10 वी च्या विद्यार्थीनिनी समूहगीत सादर केले,
स्पर्धेचे परीक्षण येडमे,पडवेकर,यांनी केले, कार्यक्रम चे संचालन व आभार प्रदर्शन पद्माकर खैरे यांनी केले,
कार्यक्रम च्या सफलतेसाठी वासाडे,परसुटकर,पत्रकार, कुंभारे,कांचन तामगाडगे,वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे,मधुकर काकडे यांनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here