लोकदर्शन चंद्रपूर 👉 मोहन भारती
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वडगाव प्रभाग क्र. 08 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. देवानंद वाढई, सौ. राखी कंचर्लावार, श्री. सत्यम गाणार व सौ. सोनल देवतळे यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रचार सभेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुडे, पालकमंत्री अशोक उईके, माजी खासदार रामदास तडस, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कृतिकुमार भांगडीया, तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित नेत्यांनी विकासाभिमुख राजकारण, पारदर्शक प्रशासन व जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भाजपने केलेल्या कार्याची माहिती नागरिकांना दिली. वडगाव प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सभेला चंद्रपूर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे.





