PM-SURAJ देशव्यापी योजनेचा १३ मार्चला शुभारंभ

By : Shankar Tadas

चंद्रपूर: प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) व सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरीता शिक्षणाच्या प्रभावी सुविधा, शिष्यवृत्ती तसेच सिमांत वर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण व अल्प व्याजदरात कर्जाद्वारे आर्थिक सहाय्यता आदी प्रयोजनार्थ समाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पीएम-सुरज (प्रधानमंत्री-सामाजिक उत्थान व रोजगार आधारीत जनकल्याण) या महत्वाकांक्षी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास सन्माननिय अतिथी म्हणून नागपूर येथे केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तर चंद्रपूर येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
दि. १३ मार्च २०२४ रोजी सायं. ०४ वा आयोजित PM-SURAJ या देशव्यापी पोर्टल शुभारंभाचा कार्यक्रम मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते होत आहे. देशभरातील ५२५ जिल्ह्यात ही सामाजिक सशक्तीकरण योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्यातील ९ जिल्ह्यांचा या योजनेत प्रारंभिक स्तरावर समावेश करण्यात आले असून या जिल्ह्यांसाठी प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रीय कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुंबईकरीता केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नागपूर जिल्हा-केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सिंधुदूर्ग-केंद्रीय मंत्री नारायण राणे, नाशीक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, धुळे-केंद्रीय राजमंत्री भागवत कराड, सोलापूर-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अहमदनगर-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हिंगोली- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *