फुले एज्युकेशनचे मराठी व तेलगु भाषेत सत्यशोधक विवाह माहिती पुस्तक प्रकाशित

 

लोकदर्शन 👉 रंगनाथ ढोक

नायगांव – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे नायगांव,सातारा येथे सत्यशोधक समाज स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मराठी भाषा आणि प्रा.सुकुमार पेटकुले यांनी तेलगू भाषेत सत्यशोधक विवाह पद्धत बाबतचे पुस्तक नायगांव च्या स्वागाताध्यक्षा सौ.शुभांगी नेवसे ,सरपंच सौ.साधना नेवसे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , प्रदेशाध्यक्षा सौ.मंजिरी धाडगे, मा.स्मिता पानसरे , मा.झेबुनिरसा शेख,अँड.वासंती नलावडे, मा.सुजाता गुरव, मा.दर्शना पवार,यांचे शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी भारत विकास परिषद च्या सुविधा नाईक, उज्वला नवले, उषा घोगरे,ऋता वर्धे ओतुरचे श्री व सौ. मालतू डुंबरेपाटील, उपस्थित होते.
यावेळी मुख्य समन्वयक अरविंद खैरनार म्हणाले की रघुनाथ ढोक यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तर सत्यशोधक विवाह लावतातच सोबत त्यांनी तेलंगणा राज्यात जावून देखील 4 सत्यशोधक विवाह लावलेत आणि आता तिकडील लोकांना देखील मराठी, तेलगू भाषेत सत्यशोधक विवाह सहज लावता यावेत म्हणून हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की अंधश्रद्धा ,कर्मकांड आणि आर्थिक उधळपट्टी याला मूठमाती द्यायची असेल तर महात्मा फुले यांनी दिलेल्या विचाराने सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे ही या विज्ञानयुगात ,आधुनिक काळाची गरज आहे तरच सर्व समाज प्रगतीपथावर योग्य दिशेने जाईल आणि हेच महापुरूषांचे कार्याला, विचारला अभिप्रेत आहे . तसेच हे सत्यशोधक विवाह लावण्याचे कार्य सर्वत्र संस्थेचे वतीने मोफत लावले जाते असे देखील ढोक म्हणाले.
या प्रसंगी प्रा. सुदाम धाडगे यांचे नियोजित महाराष्ट्रातील धरणे आणि मी माझे जीवन या डमी पुस्तकाचे देखील प्रकाशन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी खैरनार,तर आभारप्रदर्शन अनुरीता झगडे यांनी मानले.यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *