फुले एज्युकेशनतर्फे पेटकुले आणि वाढई यांचा तेलंगाना येथे 47 वा सत्यशोधक विवाह सोहळा थाटात संपन्न

 

लोकदर्शन प्रतिनिधी 👉 रघुनाथ ढोक

आदिलाबाद/पुणे : फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी दु.1 वा. तेलंगाणा, आदिलाबाद येथील पद्मनायका फंक्शन हॉल ,मावाला मध्ये सत्यशोधक प्रा.सुकुमार पेटकुले यांची कन्या सत्यशोधिका सुहर्षा राणी, बी.टेक. आणि समाजसेवक पुंडलीक वाढई, राजुरा ,चंद्रपुर यांचे सुपुत्र सत्यशोधक ललीत, बी .टेक या उच्चशिक्षिताचा 47 वा .मोफत सत्यशोधक विवाह सोहळा शानदार पणे प्रबोधनात्मक संपन्न झाला. यावेळी आदिलाबाद चे माजी मंत्री जोगु रामन्ना,आमदार पायला शंकर, जि.प.सदस्य गणेश रेड्डी,पं.स.अध्यक्ष लक्ष्मी कल्यानम राजेश्वर, राजुरा चे माजी आमदार ऍड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे,नांदेड चे माजी शिक्षणाधिकारी आनंदराव वाढई आणि सोशल मीडियाचे अध्यक्ष मयुर वसंतराव मोहुर्ले आवर्जुन उपस्थित होते.
या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व हुमन राईटस असो. ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास महाजन,राजेंद्र महाडोळे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम तसेच फुले दाम्पत्य 1 पुटी पुतळे संस्थेचे वतीने भेट देण्यात आले.तर आई वडील ,मामा मामी , विधिकर्ते सुनील कावळे आणि स्वरबहार यमुनस्वार ऑर्केस्ट्रा ,चंद्रपूर यांनी अनेक महापूर्षांचे गाणी गात फुलेमय वातावरण करून विवाह सोहळ्याची रंगत वाढविली त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. तसेच यावेळी सत्यशोधक ढोक यांनी सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर देखील दाखविला.यावेळी अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन मनोज सोनुले यांनी केले तर सुनील कावळे व रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभुषेत विधी कार्य पार पाडले.
“या विवाहासाठी सिक्कीम चे माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवासजी पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी संरक्षण मंत्री ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आवर्जून शुभ संदेश आणि या सत्यशोधक विवाह सोहळ्यास तसेच पुस्तकं प्रकाशनासाठी शुभेच्या दिल्या त्या संदेशाचे वाचन शशांक वाढई यांनी केले.”
याप्रसंगी आयोजकाचे वतीने राजुराचे माजी आमदार ऍड.वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, नांदेडचे माजी शिक्षणाधिकारी आनंदराव वाढई , डॉ.लेनगुरे,शेतकरी संघटना कोरपणाचे रमाकांत मालेकार ,सुनीता व रेखाताई मोहूर्ले यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह विधीचे मराठी आणि तेलगु भाषेतील पुस्तक फुले एज्युकेशन संस्थेचे वतीने प्रकाशित केले.विवाहास आलेल्या सर्व मंडळीना हे पुस्तक मोफत वाटप केल्याने तसेच सर्व मान्यवर याना पेटकुले आणि वाढई यांचे शुभहस्ते फुले दाम्पत्य फोटो फ्रेम देऊन स्वागत केल्याने आमदार ऍड.चटप यांनी दोन्ही परिवाराचे अभिंनदन करीत या पुढे सर्वांनीच या पद्धतीने विवाह करून फुले दाम्पत्याचे कृतिशील कार्य पुढे नेऊन गरजूंना या निमित्ताने आर्थिक मदत करावी असे प्रतिपादन केले. शिक्षणाधिकारी आनंदराव वाढई म्हणाले की या पुस्तकाने विवाह कोणीही लावू शकतील, कोणा ठराविक मध्यस्थीची गरज नसून याने अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली दिली जाईल यासाठी श्रीमंतांनी आर्थिक उधळपट्टी न करिता साधे लग्न केले तर गरीब जनता याचे नक्कीच अनुकरण करेल त्यामुळे समाजातील भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
तर सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की या पुर्वी प्रा.सुकुमार पेटकुले यांनी 7 मे 2022 रोजी प्रथम उच्चशिक्षित मुलाचे सत्यशोधक विवाह चंद्रपुर, मुल येथे लावला आणि आता उच्चशिक्षित कन्याचे देखील सत्यशोधक विवाह पार पाडला.फुले दाम्पत्याचे हे कृतिशील कार्य पुढे नेऊन एक आदर्श निर्माण करून परिवर्तन चळवळीचे आपण साक्षीदार बनुया असे आवाहन देखील केले . चंद्रपूर,यवतमाळ,नागपूर,अमरावती ,पुणे ,मुंबई ,नांदेड,परभणी, वांकडी, तेलंगणा ,हैद्राबाद मधील विविध संघटनेचे पदाधिकारी सत्यशोधक कार्यकर्ते आणि हजारोंचा जनसमुदाय या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी उपस्थितीत राहिल्याने सर्वांमध्ये दोन्ही परिवाराचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत होते आणि सर्वत्र या सोहळ्याचीच चर्चा रंगली होती. सुत्र संचालन सतीश गुरूनुले यांनी केले तर आभार कार्तिक पेटकुले यांनी मानले आणि मोलाचे सहकार्य सुभाष शेंडे ,उमेश ढोले,भास्कर प्रधान,शिवाजी गुरूनुले,रामुल शेंडे,सबंना शेंडे,उत्तमराव वाढगुरे ,अमोल गुरूनुले ,सुरेश गुरूनुले, भेंडारे यांनी केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *