भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन.. .   

लोकदर्शन 👉 राहुल खरात

गोमेवाडी गावचे तरुण, तडफदार, धाडसी, युवा नेते उत्तमराव शिंदे यांचे अचानक झालेले दुःखद निधन धक्कादायक आहे . प्रथमतः त्यांच्या पवित्र आत्म्यास कोटी कोटी प्रणाम . भावपूर्ण श्रद्धांजली .
गोमेवाडीचे माजी सरपंच दिवंगत नेते राजाराम शिंदे यांचे धाकटे बंधू म्हणून उत्तमराव सर्वत्र ओळखले जात . अत्यंत सुस्वभावी, शांत, सरळमार्गी, सर्वांशी आपुलकीने वागणारे, प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारे, प्रसंगी सामान्यांचा आवाज बनणारे, समाजातील सर्वच स्तरातल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी धावणारे एक निगर्वी कष्टाळू आणि ध्येयवेडे नेतृत्व म्हणून उत्तमराव सर्वदूर ओळखले जात . जिगरबाज, करारी, धाडसी, कणखर वगैरे शब्द चपखल लागू व्हावेत असे उत्तमरावांचे व्यक्तीमत्व . गोमेवाडीतल्या अनेक प्रगत युवकांमध्ये उठून दिसणारे व्यक्तीमत्व म्हणून संपूर्ण परिसर उत्तमराव यांना ओळखत होता . खरोखरच नेतृत्व किती लोकाभिमुख असू शकते याची प्रचिती उत्तमरावांच्या आजच्या अंत्ययात्रेतल्या शेकडोंच्या गर्दीने सिद्ध करून दाखविली . संपूर्ण गोमेवाडीने सर्व व्यवहार बंद ठेवून या सदगदीत अंतकरणाने आपल्या सुपुत्रास शेवटचा निरोप दिला . हंबरडा फोडून रडणाऱ्या असंख्य माता भगिनींच्या आर्त रडण्याने प्रत्येकाला गहीवरून येत होते . तालुका, जिल्हा, प्रदेश स्तरावरील अनेक मान्यवरांनी उत्तमरावांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन या आपल्या भावाला, दोस्ताला आदरांजली वाहीलीच तथापि उत्तमरावांच्या नेतृत्वाची, व्यक्तीमत्वाची उंची उंचच होती हे उपस्थितीतून दाखवून दिले . गोमेवाडीतला हा शिंदे परिवार सर्व सामान्य स्तरातून प्रचंड कष्ट, सचोटीतून नावारूपास आलेला परिवार आहे . शिंदे परिवारातल्या कर्त्या पुरुषांनी गोमेवाडीलाच आपले घर मानून सर्वांसाठी झोकून देवून नेहमीच काम केले . प्रसंगी कटु गोड अनुभव, मान अपमान चाखत सामान्यांसाठी सामान्य बनण्याचे काम राजाभाऊ , उत्तमराव व अन्य भावंडांनी केले . गोमेवाडीतल्या प्रत्येक सार्वजनिक, सामाजीक राजकीय कार्यात शिंदे परिवारातला कोणी नाही असे कधीच घडलेच नाही, आणि गावानेही शिंदे भावंडांना घेतल्या शिवाय कोणतेही कार्य केले नाही . ही गेली ३५ वर्षाची परंपरा चालुच आहे . उत्तमराव यांच्या जाण्याने नव्या पिढीतला दीन, दलित, शेतकरी, कष्टकरी, बहुजन, अल्पसंख्याकांचा सच्चा साथी गेल्याचे दुःख प्रत्येक गोमेवाडीकर अनुभवतोय . उत्तमरावांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या शिंदे परिवारावर हे दुःख सहन करण्याची ताकद विधात्याने सर्वांना द्यावी . उत्तमरावांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली . विनम्र अभिवादन .

*सादिक खाटीक आटपाडी जि . सांगली .*
* प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .
* प्रदेश कार्यकारणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *