देवा त्यांना सुबुद्धी दे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕बालाजी मंदिरासमोर नागरिकांनी केली मूक प्रार्थना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
फुले,शाहू,आंबेडकर, अनेक थोर संत,व समाज सुधारकांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आज राजकीय पुढाऱ्यांकडून जो असभ्य, असंस्कृत, व मानवतेला न शोभणाऱ्या भाषेचा वापर होतो आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावत आहे शिवाय अशा प्रकारच्या वर्तनामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकत आहे, म्हणून जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुसंस्कृत व सभ्य भाषेचा वापर करून महाराष्ट्राच्या आदर्श संस्कृती चे त्यांच्याकडून जतन व्हावे यासाठी त्यांना सद्बुद्धी लाभो ,यासाठी 10 मार्च ला देऊळगाव राजा येथे बालाजी महाराज चरणी मूक प्रार्थना करण्यात आली,
जनता राजकीय पुढाऱ्यांकडे आदर्श म्हणून पाहत असते,त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून अनेक आशा अपेक्षा असतात,जनतेच्या सर्वांगीण प्रगतीची धुरा राजकीय नेतृत्वाच्या खांद्यावर असते, राजकीय नेतृत्व जनतेच्या आशेचा किरण असताना आज समाज माध्यमे,, वर्तमानपत्रे बघितले तर असे दिसते की राजकीय व सामाजिक नेतृत्व एकमेकांचा आदर सन्मान न करता आई,वडील,पत्नी, भाऊ,बहीण, अगदी नको त्या पातळीवर जाऊन एकेरी व गलिच्छ भाषा वापरून इथली राजकीय संस्कृती मोडीत काढत आहे, यामुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, शिवाय जनतेचा भ्रमनिरास होत आहे ही गोष्ट संयुक्तिक नाही, पक्ष कोणताही असो प्रत्येक पक्षातील व सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाने इथल्या संस्कृती चे पालन करणे क्रमप्राप्त आहे, जर जनता खास करून युवा पिढी समोर निष्कलंक, निष्कपट, चारित्र्य संपन्न,दूरदृष्टीकोन, असलेल्या नेतृत्वाचा आदर्श नसल्यास सुजाण युवा पिढी राजकारण कडे पाठ फिरवतील, पर्यायाने जनतेला सक्षम नेतृत्व मिळणार नाही यासाठी देऊळगाव राजा येथील नागरिकांनी बालाजी मंदिर समोर मूक प्रार्थना केली,
सर्वप्रथम खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,ही सामूहिक प्रार्थना केली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, कार्यक्रमात पुरुष, महिला,पत्रकार, उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *