मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण थाटात संपन्न

सुधीरभाऊ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा मंच – देवराव भोंगळे

घुग्गुस येथील प्रयास सभागृहात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा सांस्कृतिक महिला संमेलनाच्या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

23 व 24 जानेवारीला मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक व क्रीडा महिला महोत्सवाचे आयोजन प्रयास सभागृहात करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात महिला स्पर्धेकानी मोठ्या संख्येत भाग घेतला होता त्या अनुषंगाने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन व बक्षीस वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा युवमोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिप सभापती महिला व बालकल्याण नितु चौधरी माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे वाहतूक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, भाजपा नेते संजय भोंगळे, सरपंच दीपा वडस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते, पूजा दुर्गम, महिला आघाडीच्या पुष्पा रामटेके व नाझमा कुरेशी मंचावर उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले. सांस्कृतिक महिला महोत्सवात महिलांची ऐतिहासिक गर्दी होती. दरवर्षी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करतो त्यामुळे महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम भाजपा करते. महिलांमध्ये सुप्त कला गुण असतात यांना मंच देण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणात भाजपा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले मला अतिशय आनंद होत आहे महिला सांस्कृतिक महोत्सवात 5000 हजाराच्या वर महिलांची उपस्थिती होती परंतु या कार्यक्रमास एकही गालबोट लागले नाही हे महिला शक्तीचे यश आहे असे ते म्हणाले.
बक्षीस वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

एकेरी नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 3,000 हजार रुपये व शिल्ड काजल पाटील, द्वितीय 2,000 हजार रुपये व शिल्ड प्रीती दाढे, तृतीय 1000 रुपये व शिल्ड शुभांगी जिवने यांना देण्यात आले.
समूह नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 4,000 हजार रुपये व शिल्ड संगीता थेरे समूह, द्वितीय 3,000 हजार रुपये व शिल्ड बिरसा मुंडा समूह, तृतीय 2,000 हजार रुपये संजीवनी समूह व विशेष पारितोषिक 1000 रुपये व शिल्ड सुनीता पाटील व अर्चना बेहरे यांना देण्यात आला.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1500 हजार रुपये व शिल्ड वीणा घोरपडे, द्वितीय 1000 हजार रुपये व शिल्ड सपना मेळावार, तृतीय 500 रुपये व शिल्ड कविता विष्णुभक्त यांना देण्यात आले.
लिंबू चम्मच स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड सुनीता घिवे, द्वितीय 1000 हजार रुपये व शिल्ड शीतल काळबांधे.
बोरा रेस स्पर्धेत प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड स्वीटी ठावरी, द्वितीय 1000 रुपये व शिल्ड शुभांगी मस्के यांना देण्यात आले.
रस्सी खेच स्पर्धेत प्रथम पारितोषिक 2,000 हजार रुपये व शिल्ड दिपज्योती महिला बचत गट, द्वितीय 1,500 रुपये व शिल्ड दुर्गा महिला बचत गट, तृतीय 1,000 व शिल्ड साची महिला बचत गट यांना देण्यात आले.
संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड शिल्पा सोंडुले, द्वितीय 1,000 रुपये व शिल्ड ब्युला लिंगमपेल्ली, तृतीय 500 रुपये व शिल्ड वंदना मुळेवार यांना देण्यात आले.
टिपका रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड निखिता जानवे, द्वितीय 1,000 रुपये व शिल्ड कोमल भोगेकर, तृतीय 500 रुपये व शिल्ड स्वाती श्रीवास्तव यांना देण्यात आले.
संस्कार भारती रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड शीतल काळबांधे, द्वितीय 1,000 रुपये व शिल्ड अश्विनी सोनकर, तृतीय 500 रुपये व शिल्ड दुर्गा जुमनाके यांना देण्यात आले.
पोस्टर रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड वैशाली झाडे, द्वितीय 1,000 रुपये व शिल्ड लक्ष्मी वासाडे, तृतीय 500 रुपये व शिल्ड सरिता खैरे यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. किरण बोढे प्रयास सखी मंच घुग्गुस यांनी केले तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस यांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रयास सखी मंच घुग्गुसच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे निशा उरकुडे सीमा पारखी सारिका भोंगळे शारदा गोडसेलवार सुनीता पाटील कोमल रामटेके वसुधा भोंगळे सौभाग्या तांड्रा चेतना गावंडे वृंदा कोंगरे रंजना ठाकरे सुनीता घिवे अर्चना लेंडे वीणा घोरपडे अर्चना बेहरे वंदना मुळेवार सुरेखा डाखरे अर्चना बरडे व
मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुनंदा लिहीतकर सोनू बहादे शीतल कामतवार खुशबू मेश्राम अजय लेंडे सुनील ब्रह्मे यांनी प्रयत्न केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *