शिवभक्तांच्या सेवेसाठी नोकारी खुर्द यात्रेत विशेष उपक्रम

By : Ravikumar Bandiwar 

नांदा फाटा : 

महाशिवरात्रीनिमित्त शंकर देवस्थान नोकारी खुर्द येथे होत असलेल्या भव्य यात्रेमध्ये साबुदाणा उपवास खिचडी (उसळ) वितरित करण्यात आले. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रेत खिचडी वितरित करण्यात येते. शंकर देव मंदिर परिसर हा अतिशय ग्रामीण भागातील असून येथे दर्शनासाठी परिसरातील गोरगरीब जनता ही सहपरिवार यात्रेमध्ये देव दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्तगणांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे परिवारातील सर्व व्यक्तींना नाश्ता करवणे व शुध्द पाणी व चहा हे परवडणारे नसते व उन्हाचे दिवस असल्यामुळे भक्तगणांना कमजोरी किंवा चक्कर येणे अशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यासाठी भक्तगणांना पिण्यासाठी शुद्ध आरो थंड पाण्याची व्यवस्था करून खिचडी वितरित करण्यात येते तसेच दुसऱ्या दिवशी नमो टी सुद्धा वितरित करण्यात येते. नमोटी हा उपक्रम मा हंसराजजी भैय्या अहिर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे मार्गदर्शनतून मागील दहा वर्षापासून निरंतर कुठलाही खंड न पडता महाशिवरात्री यात्रेत मोफत दरवर्षी वितरित करण्यात येतो.  या चहामध्ये गवती चहा अद्रक तुळशी गूळ अशाप्रकारे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक चहा देण्यात येतो. या यात्रेत पाणी वितरित करणे हा मागील 30 वर्षापासून कुठलाही खंड न पडता उपक्रम चालू आहे. या यात्रेत महाप्रसादाचे सुद्धा वितरित करण्यात येत व साबुदाणा खिचडी हा मागील वर्षापासून  उपक्रम चालवण्यात येत आहे.  शुद्ध थंड आरोचे पाणी वितरित करणे महाप्रसाद वितरित करणे साबुदाणा खिचडी वितरित करणे तसेच नरेंद्र मोदी चहा वितरित करणे हा उपक्रम वामन तुराणकर उपसरपंच नोकरी खुर्द तसेच सतीश भाऊ उपलांचेवार शहर अध्यक्ष गडचांदुर यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो.  या कार्यक्रमासाठी नेहमी सहकार्य करणारे अरुण भाऊ डोहे नगरसेवक गडचांदुर ग्रामसेवक जी मोरे नगरसेवक गडचांदूर,सुनील उरकुळे माजी सभापती,निलेश भाऊ ताजणे माजी नगरसेवक गडचंदुर, रोहन काकडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष कोरपणा, राकेश जी अरोरा , हरिभाऊ गोरे गटचांदूर शहर सचिव व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नोकरी खुर्द येथील कार्यकर्ते व समाजसेवक तसेच गडचांदुर मधील कार्यकर्ते व समाजसेवक आपला वेळ देऊन उपस्थित राहतात.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *