महारेशीम अभियानात वर्धा जिल्हा अव्वल

By : Shankar Tadas

वर्धा (जिमाका) : रेशीम शेती कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे यासाठी राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्याने उत्तम काम केले आहे. अभियान कालावधीत 593 हेक्टर तुती लागवडीसाठी 550 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून विभागात ही सर्वाधिक नोंदणी आहे.

पारंपारिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी इतर पिके सुध्दा घ्यावी, यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रेशीम कोष उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी मनरेगा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 योजनेंतर्गत जमीन तयार करणे, तुती रोपे लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, ठिंबक सिंचन व पाणी व्यवस्थापन, किटक संगोपन साहित्य यासाठी अनुदान दिले जाते.

जिल्ह्यात काही वर्षात तुतीचे क्षेत्र सातत्याने वाढले आहे. जिल्ह्यात 301 एकरवर तुतीची लागवड झाली आहे. गेल्या केवळ एकाच वर्षात 107 एकरने तुतीचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता रेशीम विभागाच्यावतीने अंडीपुंजांचा तसेच चॉकी धारकांकडुन चॉकीचा पुरवठा केला जातो.

रेशीम कोष उत्पादनातून शेतकऱ्यांना वर्षभरात एकरी 4 ते 5 बॅचद्वारे 4 ते 5 क्विंटल कोष उत्पादन मिळते. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात 23 मेट्रीक टन कोष उत्पादन झाले आहे. हे उत्पादन देखील विभागात सर्वाधिक आहे. यावर्षी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न केले आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळेच महारेशीम अभियानात तुती लागवड नोंदणीत जिल्हा विभागात अव्वल राहिला आहे.

रेशीम अधिक उत्पन्न देणारी शेती – राहुल कर्डिले

रेशीम कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे. या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी अनुदान दिले जाते. जिल्ह्यात तुती लागवडीसाठी सकारात्मक वातावरण तयार होत आहे. महारेशीम अभियान 2024 मध्ये जिल्ह्याला 300 एकर तुती लागवडीसाठी नोंदणीचे लक्षांक होते. प्रत्यक्षात 550 शेतकऱ्यांनी 593 एकरवर नवीन नाव नोंदणी केली. विभागात ही सर्वाधिक नोंदणी आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *