श्रीया फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्विस सेंटर आयोजित महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ♦️महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यासाठी विविध तज्ञ मान्यवरांनी केले मार्गदर्शन.

 

लोकदर्शन उरण.👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २२ जानेवारी
श्रीया फाऊंडेशन पाले आणि कॉमन सर्विस सेंटर कोप्रोली तर्फे उरण तालुक्यातील पाले गावात श्री हनुमान मंदिर प्रांगणात दिनांक २१/१/२०२४ रोजी महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी आता सर्वच क्षेत्रात पुढे आले पाहिजे. स्वावलंबी जीवन जगत आत्मनिर्भर झाले पाहिजे स्वतः सोबत कुटुंबालाही पुढे नेले पाहिजे असे मनोगत व्यक्त करत नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी श्रीया फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्विस सेंटरचे संस्थापक संदीप म्हात्रे, स्मिता म्हात्रे यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक केले. महिलांना सक्षमीकरण करणे, नागरिकांच्या अडी अडचणी सोडविणे, शासकीय दाखले, कागदपत्रे काढून देणे, महिला बचत गटाना मार्गदर्शन करणे, पुरुष व महिलांना उद्योगासाठी हातभार लावणे, गोर गरिबांच्या सुख दुःखाला धावून जाणे अशी अनेक कामे संदीप म्हात्रे, स्मिता म्हात्रे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरु असून त्यांचे कार्य हे सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहेत असे गौरवोदगार माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी काढले. उपस्थित विविध तज्ञ मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रातील माहिती उपस्थित महिलांना दिली. या कार्यक्रम प्रसंगी सायली म्हात्रे नगराध्यक्षा उरण, ऍड अपर्णा शिंदे हायकोर्ट मुंबई, निराबाई पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आवरे, देवयानी म्हात्रे सामाजिक कार्यकर्त्या दापोली पनवेल, प्रणिता म्हात्रे सरपंच गोवठणे, निलेश कुंभारे स्टेट मॅनेजर कॉमन सर्विस सेंटर (CSC), संजीवन म्हात्रे हास्य सम्राट, राजू गिते VNVJNT महामंडळ अलिबाग, प्रतिक पाटील OBC महामंडळ अलिबाग, चंद्रकांत म्हात्रे माजी पोलीस निरीक्षक, पोसुराम म्हात्रे माजी असिस्टंट पोलीस निरीक्षक, विष्णु म्हात्रे गुरुजी निवृत्त शिक्षक पाले, सुरेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते पाले, सुनील वर्तक समालोचक, अमित म्हात्रे पाले गाव अध्यक्ष, मानसी पाटील ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी पनवेल, निशा म्हात्रे कोप्रोली उरण महिला अध्यक्षा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍड अपर्णा शिंदे यांनी महिलांनी न घाबरत व्यवसायात उतरले पाहिजे. अनेक उद्योग हे घरातूनच निर्माण झाले त्यामुळे आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका व्हा असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना दिला. तर CSC चे स्टेट मॅनेजर निलेश कुंभारे यांनी उदयमुख महिलांच्या पाठी CSC नेहमी रहाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्मिता म्हात्रे आहेत. तर ओबीसी महामंडळाचे प्रतीक पाटील व VNVJNT महामंडळाच्या राजू गिते यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी सरपंच निराबाई पाटील व हास्य सम्राट संजीवन म्हात्रे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाकांत म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, मायनाथ म्हात्रे, विनोद म्हात्रे, अनिल म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मच्छिद्र म्हात्रे, प्रितम म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, सुधीर म्हात्रे, भूषण म्हात्रे, राजेश म्हात्रे, बाळाराम म्हात्रे, विजय म्हात्रे, हनुमान म्हात्रे, रुपाली म्हात्रे, प्रगती म्हात्रे, मिल्का म्हात्रे,अनिता म्हात्रे, दर्शना म्हात्रे, रविना म्हात्रे, तृप्ती म्हात्रे, विजया म्हात्रे, तुळसाबाई म्हात्रे, छाया म्हात्रे, साधना म्हात्रे, स्मिता रसाळ, श्रीया म्हात्रे, रुचिता म्हात्रे, प्रीती म्हात्रे आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे, अमर म्हात्रे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप म्हात्रे यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षनीय होती. यावेळी महिलांना मानसी पाटील यांनी “इमिटेशन ज्वेलरी” चे प्रात्यक्षिक दाखविले तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम माहिती देण्यात आली. अनेक तज्ञांनी वेगवेगळ्या विषयावर महिलांना मार्गदर्शन केल्याने उपस्थित महिलांनी श्रीया फाऊंडेशन पाले आणि कॉमन सर्विस सेंटरचे संस्थापक संदीप म्हात्रे, स्मिता म्हात्रे व उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. एका चांगल्या व उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे महिला भगिनींनी यावेळी बोलून दाखविले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *