*श्रीराम जन्म अयोध्या प्रतिष्ठानच्या दिवशी विद्यार्थीनी बघितले सत्यशोधक चित्रपट* महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांचे पुढाकार*. 📌 *न्यु नरेश चे स़चालक विजय ठाकुरवार व सागर ठाकुरवार यांनी विद्यार्थिनींना 50 टक्के सवलत दिले*   

📌 श्रीराम जन्म अयोध्या प्रतिष्ठानच्यादिवशीविद्यार्थीनी बघितले सत्यशोधकचित्रपट*

📌  महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांचे पुढाकार

📌 न्यु नरेश चे स़चालक विजय ठाकुरवार व सागर ठाकुरवार यांनी विद्यार्थिनींना 50 टक्के सवलत दिले*

रविकुमार बंडीवार

नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील गंडचादूर येशील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांचे पुढाकाराने विद्यार्थिनींनी रामजन्म अयोध्या प्रतिष्ठान दिनानिमित्त सत्यशोधक सिनेमा बघितला त्यात त्यांनी महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय “महात्मा” (संस्कृत: “महान आत्मा”, “पूज्य”) पदवी प्रदान केली होती.

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. आज दिनांक 22/1/2024 रोज सोमवार ला महात्मा गाँधी महाविद्यालयाचे श्री.मून सर श्री. बांदरे सर श्री. देव सर यांनी पुढाकार घेऊन गड़चांदुर येथील *न्यू नरेश सिनेमा मध्ये स्वखर्चाने सत्यशोधक* हा मराठी चित्रपट BSC च्या विद्यार्थ्यांना बघण्यास प्रोत्साहित केले. हा चित्रपट क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले व स्त्रियाकारिता शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्य वर आधारीत आहे असे चित्रपट प्रत्येक समाज बांधव तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावे आणि तसे प्रोत्साहीत करावे असे प्रतिपादन श्री मून सर, श्री देव सर, व श्री बांदरे सर यांनी या वेळेस दिले. हा चित्रपट न्यू नरेश सिनेमा* गडचांदूर येथे प्रदर्शित झाला असून ह्या चित्रपटगृहा चे मालक श्री विजयभाऊ ठाकुरवार व श्री सागरभाऊ ठाकुरवार यांनी खास विदयार्थ्यांन करिता ५०% सवलत दरात हा *”सत्यशोधक”* चित्रपट उपलब्ध केला आहे तरी कोरपना तालुक्यातील सर्व शाळांनी व महाविद्यालयांनी सर्व विदयार्थ्यांना बघण्यास प्रोत्साहीत करावे असे असे आव्हान चित्रपटगृहचे मालक श्री विजयभाऊ ठाकुरवार व श्री सागरभाऊ ठाकुरवार यांनी केले आहे तरी यांचे मनापासून शतशः आभार.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *