स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ युवती साठी आदर्श :-अल्का आत्राम*

 

*पोंभुर्णा*

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी एकता युवती मॅराथान स्पर्धा आयोजित करीत भाजपा महिला मोर्चाने जयंती उत्साहात साजरी केली. स्वामी विवेकानंद हे तरुणांनी देशा साठी आपली ऊर्जा वापरण्यासाठी नेहमीच युवकांना विचार दिले तसेच राजमाता जिजाऊ आणि महिला आणि मुलींसाठी आदर्श राहिले आज त्यांची जयंती युवतीना आपली एकता एकात्मता टिकवण्यासाठी दौड लावली. यावेळी ठाणेदार गदादे सर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखून मॅराथन सुरु करण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस 5000 वैष्णवी निलेश कुणघाडकर ही विद्यार्थीनी प्रथम बाजी मारली दुसर क्रमांक 3000 कांचन सुदर्शन उईके जनता विद्यालय ही विद्यार्थीनी आली तिसरी 2000आश्लेषा विनायक धोंगडे चिंतामणी कॉलेज हिने पटकवले. या सर्वांचे अभिनंदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले. यावेळी ठाणेदार गदादे सर, अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पीपरे नागराध्यक्ष, अजित मंगळगिरीवार उपाध्यक्ष, ओमदेव पाल महामंत्री, हरीश ढवस महामंत्री, ऋषी कोटरंगे अध्यक्ष, गजानन मुदपूवार, गुरूदास पीपरे, नरेंद्र बघेल, महेश रणदिवे, अजय मस्के, वैशाली बोलमवार, रजिया कुरेशी, श्वेता वनकर, रोहिणी ढोले, नंदा कोटरंगे, शारदा गुरनुले, आकाशी गेडाम, उषा गोरांतवार, सुनीता म्यॅकलवार, वैशाली वासलवार, संगीता जिलकुंटावार, उषारांनी वनकर,मंजुषा ठाकरे, आदित्य तुम्मालवार, महेंद्र सोनुले,अजित जांबुलवार, सुरज बुरांडे, राहुल वसेकर,आणि सर्व कार्यकर्ते स्पर्धेत सहभागी युवती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here