शारीरिक विकासाबरोबरच, शारीरिक श्रमासाठी युवकांनी खेळ खेळावे : खासदार अशोक नेते

By : Shankar Tadas 

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन 

सावली / चंद्रपूर 

पाथरी :- युवकांच्या शारीरिक विकासासाठी खेळ महत्वाचे आहे. यासाठी गावकऱ्यांच्या लोकसहभागातून व ग्रामपंचायत पाथरी यांच्या सहकार्याने मोठया आनंदाने युवकांनी एकत्रीत येऊन आय.सी.सी क्रिडा मंडळ, प्रीमियर लीग पाथरी यांच्या विद्यमाने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आय.सी‌.सी क्लब ग्राउंड मौजा-पाथरी ता.सावली जि.चंद्रपुर या ठिकाणी मोठया भव्य दिव्याने स्पर्धचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन स्थानावरून खासदार अशोक नेते यांनी बोलतांना युवकांच्या शारीरिक विकासाबरोबरच, शारीरिक श्रमासाठी खेळ खेळावे.आजकाल युवकवर्ग मोबाईलकडे व्यस्त आहेत. त्यामुळे युवकवर्ग खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसते.मैदानी खेळ हा लोप पावत असून आजच्या काळात युवकांमध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय होतांना दिसतो. खेळ खेळण्याबरोबरच शरीर सुदृढ व निरोगी राहते. क्रिकेटमध्ये पंचांची भुमिका महत्वाची असते,पंचानी एखादी निर्णय देतांना चुकीचा जरी निर्णय नसेल पण तो निर्णय एखाद्या टीमला मान्य नसतो अशा वेळी मोठया प्रमाणात वाद विवाद, भांडण, झगडे होतात.यात पोलिस स्टेशन पर्यत सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत म्हणुन याकरिता पंचाचा निर्णय योग्य रीतीने मानूनच शांत चिताने आनंदाने क्रिकेटचा खेळ खेळावा.या खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिक दुष्टया चांगले राहण्यासाठी खेळ खेळावे.असे प्रतिपादन या ,क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन स्थानवरून खासदार अशोक नेते यांनी केले.

पुढे बोलतांना खा.नेते म्हणाले, या गावातील समस्या जाणुन घेऊन या गावात सुद्धा विकासासाठी कामासाठी निधी दिलेला आहे.या पाथरी गावाकडे सुद्धा माझ विशेष लक्ष आहे गावातील समस्यांचे निराकारण निश्चितच होईल. असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी हातामध्ये बॅट घेऊन खेळ खेळून आनंद व्यक्त केला.

*स्वागताचे विशेष*…
सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत
ग्रामपंचायत परिसर ते ग्राउंड पर्यंत जिल्हा.परिषद.प्रा.शाळा चमुच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व बँड द्वारे आकर्षणाने साकार करत फुलांचा वर्षाव करीत लोकनृत्य अशा आकर्षणाने विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे नृत्य सादर करून पाहुण्यांचं उत्कृष्ट स्वागत केलं..
प्रथमता कार्यक्रमाची सुरूवात खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते क्रिडा ध्वज फडकवत करण्यात आले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाथरी येथील ठाणेदार मंगेश मोहोड व जवान दलामध्ये नुकतेच सामिल झालेले शुभम ठिकरे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.

“*क्रिकेट स्पर्धेतील पुरस्कार*”

प्रथम परितोषिक ७१००१ /- द्वितीय परितोषिक ५१००१/- तृतीय परितोषिक ३१००१/-व आकर्षक चषक,विशेष बक्षीसे मानकरी विजेत्या संघाला देण्याचे आयोजन केले.

सावली तालूक्यातील पाथरी हे गाव एकोप्याचा, आदर्शाचा, जिव्हाळ्याचा, लोकसहभागाचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर चालणारा, खेळण्याबरोबरच एकात्मता,कुठल्याही जाती धर्माचा, पक्षाचा भेदाभेद न करता एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करतात हे विशेष महत्त्वाचे या कार्यक्रमातून पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून केले.

यावेळी प्रामुख्याने उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चा चे अशोक नेते,सावलीचे गट विकास अधिकारी वासनिक साहेब, ठानेदार मंगेश मोहोड साहेब, सरपंच अनिताताई ठिकरे,नायब तहसिलदार मंथनवार साहेब, माजी पं.स. उपसभापती तुकाराम पा.ठिकरे,भाजपा तालुका महामंत्री दिलिप पा.ठिकरे,सामाजिक नेते नितीन दुवावार,संचालक कृ.उ.बा.स. अशोक पा. ठिकरे,ग्रा.प.सदस्या आशा हजारे,ग्रा.प.सदस्या प्रिती लाडे, वनपाल पाटिल साहेब, माजी जि.प.सदस्य रमेश पा. ठिकरे,भाजपा युवा नेते दिलिप जाधव,भाजपा युवा नेते शरद सोनवाने,या मंडळाचे आयोजक तथा उपसरपंच प्रफुल्ल तुम्मे,
मेघाभाऊ वालदे,कमलेश वानखेडे, राकेश चेनूरवार, तथा क्रिकेट मंडळाचे सदस्यगण, गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *