वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार : आमदार किशोर जोरगेवार यांचे आश्वासन

By : Shankar Tadas

चंद्रपूर : 
चंद्रपूर वृत्तपत्र विक्रेता संघांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहकार्याने चंद्रपूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना अपघाती विमा पॉलीसी वाटप कार्यक्रम दि. ३ जानेवारी रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, उदघाटक ग्रामीण पत्रकार संघांचे कार्याधक्ष पि. एम. कुक्कु सहाणी प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष राजेश सोलापन, सचिव पुरुषोत्तम चौधरी, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष प्रविण बतकी, चंद्रपूर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विनोद पन्नासे उपस्थित होते. यावेळी पोस्ट विभागाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात पेपर वाटप करणार्‍या जवळपास शंभरच्या वर वृत्तपत्र विक्रेत्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते अपघाती विमा पॉलिसीच्या कार्डचे वाटप करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेत्यांना अपघाती विमा पॉलिसी काढण्यासाठी आमदार किशोर जोरगवार यांनी सहकार्य केले आहे. यावेळी प्रास्ताविकात चंद्रपूर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विनोद पन्नासे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा पॉलिसी काढण्यासाठी सहकार्य केल्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. वृत्तपत्र विक्रेत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने त्यांना तुटपुंजे मानधनात अतिशय हलाखीचे जिवन जगावे लागत आहे. जेव्हा की विक्रेते सकाळी वृत्तपत्र वाटून अतिशय मोलाचे कर्त्यव्य निभावत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याण्यासाठी शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अपार परिश्रमाचे कौतुक करीत त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत खंत व्यक्त केली. श्रमिक वर्गाबाबत नेहमीच सहानभुती बाळगली पाहिजे. असे म्हणत त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रमिक वर्गासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जे शक्य असेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले. यावेळी कुक्कू साहनी, राजेश सोलापन, प्रविण बतकी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पोस्ट विभागाचा १०२ वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपघाती विमा काढण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रिद्धी राऊत यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वृत्तपत्र विक्रेता संघांचे विनोद पन्नासे, मेघराज टोणपे, मच्छिन्द्र वाळके, चंद्रशेखर मत्ते,गंगाधर बिरे, प्रमोद पन्नासे, पंकज कोहळे, प्रशांत यरावार, विजय कोडापे यांनी सहकार्य केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *