चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्मिळ काळवीटाचे संरक्षण व्हावे

By : Shankar Tadas

चंद्रपूर :

Black buck in Chandrapur District must be protected.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्मिळ काळवीटा चे संरक्षण व्हावे ,अभयारण्य ,(काम्मुनिटी रिझर्व किंवा कन्झर्वेशन रिझर्व) घोषित करावे.जगात अतिशय दुर्मिळ आणि केवळ भारतीय उपखंडात आढळणारे काळवीट हरीण चंद्रपूर जिल्ह्यात केवळ कमी-अधिक १५० संख्येत आहेत,परंतु ते असंरक्षित क्षेत्रात आढळत असल्याने त्यांचे सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.विरळ जंगल आणि शेतात अधिवास करून राहणाऱ्या ह्या अतिशय सुंदर प्राण्यांसाठी रेहकुरी काळवीट अभयारण्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा काळवीट साठी काम्मुनिटी रीझर्व, कन्झर्वेशन रिझर्व किंवा अभयारण्य घोषित करावे अशी मागणी येथील पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी वनमंत्री मा सुधीर मूनगंटीवार ,राज्याचे वनसचिव,मुख्य वनसंरक्षक आणि समन्धित सर्व अधिकाऱ्याकडे केली आहे.
सलमान खान ह्यांचे काळवीट शिकार प्रकरणामुळे ह्या सुंदर प्रान्याबधःल उत्सुकता निर्माण झाली होती.१० वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असेच मानले जात होते ,परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले आणि तेव्हापासून ते क्वचित दिसले. केवळ वाघ ,बिबटाला महत्व देनाऱ्या वनविभागाने आणि लोकांनी काळवीटाची संख्या आणि संरक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही .केवळ गावकरी आणि शेतकरी आणि वन विभागाचे स्थानिक कर्मचारी ह्याचे संरक्षणामुळे आज जिल्ह्यात त्यांची अंदाजे संख्या १५०-२०० च्या आसपास असावी. परंतु देशात काळविटांची होत असलेली शिकार, कमी संख्येत प्रजनन ,नैसर्गिक मृत्यू, मांसाहारी प्राण्याची शिकार आणि असंरक्षित क्षेत्रात अधिवास अश्या अनेक कारणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळणारे दुर्लभ काळवीट किती वर्षे तग धरून राहतील ह्यात शंका आहे. म्हणून राज्य शासनाने ,वन विभागाने त्यांचे क्षेत्रात अधिवास करून राहणाऱ्या काळविटाची संख्या मोजणे,त्यांचे संरक्षणासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे.किंवा त्यांचे साठी अभयारण्य ,कम्मुनिटी, कन्झर्वेशन रिझर्व घोशित करणे अत्यावश्यक आहे अन्यथा जी गत सारस आणि माळढोक पक्षांची झाली आणि ते जिल्ह्यातून नामशेष झाले,तीच गात काळवीट प्राण्यांची सुद्धा होऊ शकते.
काळवीट हे हरीण प्रजातीचे वाटले तरी ते अन्टेलोप आहेत ( Antelope Cervicapra )त्यांना इंग्रजीत ब्लेक बक आणि संस्कृत मध्ये कृष्ण मृग म्हणतात. अनेक ठिकाणी त्यांना गझेल असेही म्हणतात .ते भारतात संखेने जास्त असले तरी ते धोकादायक वर्गात मोडतात . नरांना काळी पाठ आणि शिंगे असतात तर मादी भुऱ्या रंगाची असते. ती वर्षातून २ पिले देतात. ते ८० किमी गतीने धावू शकतात आणि १० फुट उंच उडी मारू शकतात. प्राचीन ग्रंथात कृष्ण मृगाणा चंद्र आणि वायू देवतेचे वाहन मानल्या जात होते आणि त्यांना पवित्र महान पूजले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाचे वन्यजीव संरक्षण चांगले असले तरी काळवीट हे लाजरे जीव असल्याने ते सहसा दिसत नाही परंतु ते शेती आणि उघडे वन,गवताळ भागात राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. ज्या भागात त्यांची संख्या जास्त आहे आणि उत्तम अधिवास आहे अश्या ठिकाणी लोकांच्या आणि वन विभागाच्या माध्यमातून अभयारण्य घोषित केले आणि संरक्षण केले तर निश्चितच जिल्ह्यात काळवीट मोठ्या संख्येत वाढतील . वन विभागाने काळवीटाणा ताडोबा बफर किंवा कोअर मध्ये स्थानांतर केले तर त्यांचे उत्तम संरक्षण होऊन पर्यटकांना सुधा सुंदर काळवीट पाहता येईल. सुरेश चोपणे हे गेल्या ४ वर्षापासून जिल्ह्यातील काळवीट प्राण्यावर लक्ष ठेवून असून त्यांच्या संरक्षणाची मागणी करीत आहे,जिल्ह्याचे वन मंत्री हे वन्य जीवावर प्रेम करणारे असल्याने भविष्यात काळवीटासाठी अभयारण्य घोषित करणे कठीण नाही. महाराष्ट्रात १९८० मध्ये कर्जत जवळ रेहकुरी येथे लहानसे ,एकमेव काळवीट अभयारण्य आहे.त्याच धर्तीवर चंद्रपूर येथे असेच अभयारण्य व्हावे अशी सर्व वन्यजीव प्रेमींची इच्छा आहे.

******

सौजन्य : प्रा. सुरेश चोपणे यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *