घुग्घुस-वणी मार्गावरील एसटी बस सुरू करण्याकरीता अधिकाऱ्यांसमवेत विवेक बोढे यांनी केले परीक्षणघुग्घुस-वणी मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा- विवेक बोढे


 

प्रतिनिधी:  रविकुमार बंडीवार

घुग्घुस-वणी मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची सुपर व साधारण बस (सार्वजनिक बस) गेल्या एक वर्षा पासून बंद आहे.

 

त्यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, आजारी रुग्ण, छोटे व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक, दैनंदिन प्रवासी यांना समस्येचा सामना करावा लागतो.

 

यामुळे सर्व सामान्य जनतेला खाजगी सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी प्रवास करावा लागतो व जास्त प्रवास भाडे मोजावे लागते, विद्यार्थांना टेम्पो क्लब पासून शाळेत पायी चालत जावे लागते. अशा अनेक समस्या घुग्घुस-वणी मार्गावरील नागरिकांना सहन कराव्या लागतात.

 

तेव्हा नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन मा. ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया तसेच मा. श्री. देवराव दादा भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी अध्यक्ष जि.प. चंद्रपूर यांच्या अथक प्रयत्नांनी व मा. श्री. विजय पिदुरकर माजी सदस्य जि. प. यवतमाळ यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याने तसेच मा.श्री. विवेक बोढे प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो महाराष्ट्र यांच्या परिश्रमाला यश प्राप्त झाले.

 

गुरुवार, २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे अधिकारी श्री. किशोर कुळसंगे साहेब यांच्या उपस्थितीत उडानपुल बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस चालवून परीक्षण करण्यात आले.

 

परीक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकरच नियमित बससेवा सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here