कोरपना – कातलाबोडी – कुसळ रस्त्याची दुरवस्था ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन जिल्हा प्रतिनिधी 👉 प्रा. अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना – तालुक्यातील कोरपना – कातलाबोडी – कुसळ पांदण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.
कुसळ , कातलाबोडी गावातील नागरिकाना तालुका मुख्यालय व बाजारपेठ असलेल्या कोरपना शहर गाठण्यासाठी हा अगदी जवळचा व कमी अंतराचा मार्ग आहे. मात्र सदर रस्त्याचे अर्धवट काम करण्यात आल्याने पूर्ण झालेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही किलोमीटर झालेले रस्त्याचे खडीकरण उखडले गेले असून नाल्यावरील रपटे ही वाहून गेले आहे. त्यामुळे परिसरातील शेतशिवरातील शेतकरी व ग्रामस्थांना अधिकचे अंतर मोजून उलट फेऱ्याने जावे लागते आहे. हा रस्ता झाल्यास कोरपना ते जिवती या दोन शहरातील अंतर ही कमी होईल. गावे थेट कोरपना मुख्य बाजार पेठेला जोडल्या जाईल. या करिता सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे.

कोरपना परिसरातील पांदण रस्ते दुर्लक्षितच

कोरपना येथील तलाव पासून कन्हाळगाव व खैरगाव गावाला जोडणारे दोन वेगवेगळे पांदण रस्ते आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतर ही या रस्त्याचे साधे खडीकरण सुद्धा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे दोन रस्ते झाल्यास कोरपना पासून कन्हाळगाव व खैरगाव या दोन्ही जवळच्या गावचे अंतर कमी होईल. त्यांना थेट कोरपना मुख्य बाजारपेठेत येता येईल. शिवाय उलट फेरा ही पडणार नाही.
यासाठी पांदण रस्त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे.मात्र याकडे दुर्लक्ष होत असताना दिसून येते आहे.हीच अवस्था तालुका क्रीडा संकुल पासून जेवरा , पारधीगुडा, धोपटाळा रस्त्याची आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *