काँग्रेस नेते झिबल पाटील झुमनाके यांचे निधन

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे

कोरपना – कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती झिबल पाटील जुमनाके ( ७५) यांचे मंगळवार पहाटेला मांडवा येथील त्यांचे राहते घरी निधन झाले.
जुमनाके यांचे राजकीय क्षेत्रासह सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य विषयक कार्यात भरीव योगदान राहले आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व आरोग्य सभापती पदापर्यंतची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. मांडवा गावचे सरपंच , दहा वर्ष आदिवासी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, दोनदा जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकीदींत भूषवली. तसेच कोरपना येथील ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहसचिव होते.
मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मिती व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा मोठा वाटा राहिला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *