धारिवाल कंपनी चा कामगार उमाकांत केवट याचे अपघाती निधन

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
धारिवाल कंपनी,चंद्रपूर येथील कामगार उमाकांत दुर्गप्रसाद केवट 24 याचे चंद्रपूर येथे रविवारी रात्री पडोली चौकात झालेल्या मोटारसायकल अपघातात दुःखद निधन झाले,
लोडर कलोनी ,गडचांदूर येथील रहिवासी असलेला उमाकांत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील एम सी व्ही सी शाखेचा माजी विद्यार्थी होता,आय टी आय केल्यानंतर तो धारिवाल कंपनी मध्ये 2 वर्षांपासून कार्यरत होता,
अंत्यसंस्कार मंगळवारी शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहिणी,तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहेत,
उमाकांत च्या अकस्मात अपघाती निधनानंतर लोडर कलोनी मध्ये शोककळा पसरली, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *