शिवसेना उलवे नोड शहर शाखेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ♦️शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा. ♦️उलवा नोड शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि मे
रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नव्याने वसलेल्या उलवा नोड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उलवा नोड शहर शाखेचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, सदर कार्यक्रमात शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, या शाखेतून सर्वसामान्य जनतेची कामे व्हावीत, जास्तीत जास्त सदस्य व मतदान नोंदणी व्हावी व शिवसेना पक्ष उलवा नोडमध्ये नंबर एकचा पक्ष व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.

सदर वेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, विधानसभा संघटक देविदास पाटील, शेकाप नेते राजेंद्र पाटील, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत,तालुका अधिकारी केवळ माळी,सहसंपर्कप्रमुख प्रताप हातमोडे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, हनुमान भोईर, प्रदीप ठाकूर, उपतालुका संघटक कृष्णा घरत, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उलवे नोड संघटक उत्तम म्हात्रे, करंजाडे शहरप्रमुख गौरव गायकवाड, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, संगीता भंडारकर व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते, कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असा आयोजन उलवे नोड शहरप्रमुख कु.गौरव म्हात्रे, उलवेनोड मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *