ब्रश स्ट्रोक्स कला प्रदर्शनाला रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 19 नागरिकांना कलेची आवड निर्माण व्हावी, कले विषयी जनमानसात जनजागृती व्हावी. कलेचा नागरिकांना प्रत्यक्ष अनुभव, आनंद घेता यावा या दृष्टीकोनातून कलाकार सचिन पेडणेकर, निखिल कांबळे,मोनाली खातळे, निलेश पावसकर या चार प्रतिभावंत कलाकारांनी एकत्र येत मुंबई मधील नेहरू आर्ट गॅलरी, ऍनि बेसन्ट रोड, वरळी, मुंबई येथे दि 18 एप्रिल 2023 ते 24 एप्रिल 2023 दरम्यान ब्रश स्ट्रोक कला प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर व प्रसिद्ध चित्रकार रूपेश पाटील यांनी केले. या चित्रकला प्रदर्शनात प्रतिभावंत कलाकार सचिन पेडणेकर, निलेश पावसकर, निखिल कांबळे, मोनाली खातळे यांच्या चित्रांचा समावेश आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच, म्हणजेच 18 एप्रिल पासूनच या कला प्रदर्शनाला रसिक प्रेषकांचा, नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद या कला प्रदर्शनाला मिळाला आहे. भारतातून व भारता बाहेरून परदेशातून आलेले नाग‌रिकांनी या कला प्रदर्शनाचे तोंड भरून कौतुक केले आहे. अभिनेत्री वीणा जामकर, चित्रकार रुपेश पाटील,नेहरू आर्ट गॅलरीचे डायरेक्टर नीना रेगे, डेप्युटी डायरेक्टर मिलिंद तायडे,शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, रमेश ठाकूर, मनोहर जामकर तसेच विविध नागरिकांनी, प्रतिष्टीत मान्यवर आदींनी या कला प्रदर्शनास भेट देऊन चित्रकलाकारांच्या कलेचे कौतुक केले आहे. सदर कला प्रदर्शन 24 एप्रिल 2023 पर्यंत सुरु असणार असल्याने कला प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *