भरधाव कार अनियंत्रित होवुन भिषण अपघात तिघे जागीच ठार तर एक सुदैवाने बचावला.लोकदर्शन 👉 मोहन भारती
तळेगांव : – अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर चिस्तुर जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या स्विप्ट डिझायर गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रोड खाली जावुन झाडाल धडकुन शेतात जाणार्‍या नालीवरील रपट्यावरुन उसळुन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक सुदैवाने सुखरुप बचावला आहे. हि घटना पहाटे ६ वाजताचे सुमारास घडल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज दि. ३० जुलैच्या पहाटे अमरावती येथुन चार युवक नागपुरला काहि कामानिमित्य जाण्यास अमरावती येथुन निघाले होते दरम्यान अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील चिस्तुर नजीक पहाटे ६ वाजताचे सुमारास भरधाव येणाऱ्या स्विप्ट डीझायर कार क्रमांक एम एच पी ३२१४ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार रोडच्या खाली दुर अंतरापर्यंत जावुन पळसाच्या झाडाल धडकुन नालीवरील शेतात जाणार्‍या रपट्यावरुन उसळुन या भीषण अपघातात अमित गोयते वय ३२, रा बडनेरा, शुभम गारोडे वय २५, रा. अमरावती, आशिष माटे,गाडी मालक व चालक वय २८ ,रा. राजुरा जि. अमरावती, हे हे तिघे जण जागीच ठार झाले, तर शुभम भोयर वय २६ रा. अमरावती हा सुदैवाने सुखरुप बचावला अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. कार उसळ्याने त्यामधिल युवक फेकल्या जावुन त्याचा मृतदेह चक्क झाडावर अडकला होता. तर दुसरा गाडीत अडकला होता तिसरा मृतदेह नालीवरील रपट्याचे बाजूला नालीत पडून होता .सदर अपघाताची माहिती मिळताच तातडीने तळेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात आले आहे. मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे,श्याम गहाट,राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर,विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी पाठवले. यामध्ये जळगाव येथील युवक कादर खान यांनी काहि युवकांचे मदतीने मृतदेह काढण्यात पोलिसांना मोठी मदत केली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *