महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी*

लोकदर्शन पुणे 👉 राहुल खरात

पुणे – इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग, महात्‍मा ज्‍योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्‍योती) व सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण, पुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले यांच्‍या 196 व्या जयंतीनिमित्‍त दिनांक ११.०४.२०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.
त्‍याअनुषंगाने दिनांक ११.०४.२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले यांच्‍या जयंतीनिमित्‍त महात्‍मा जोतीराव फुलेवाडा,समता भूमी , पुणे येथे मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, पुणे जिल्‍हा यांच्‍या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्‍मा जोतीराव फुले व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्‍यात आले, त्‍यानंतर महात्‍मा जोतीराव फुलेवाडा ते ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले स्‍मारक पर्यंत रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर रॅलीमध्‍ये सत्‍यशोधक रघुनाथ ढोक हे उपस्थित होते त्‍यांनी सदर रॅलीचे नेतृत्‍व केले व पुणे जिल्‍ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी तसेच पुणे जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
तसेच मुख्‍य कार्यक्रम ज्ञानज्‍योती सवित्रीबाई फुले स्‍मारक येथे मा.आमदार सुनिल कांबळे, पुणे लष्‍कर विधानसभा मतदारसंघ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाची रुपरेषा तसेच प्रास्‍ताविक मा. सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण पुणे श्रीम.संगिता डावखर यांनी केले. सदर कार्यक्रमामध्‍ये व्‍याख्‍याते मा.डॉ.श्री.श्रीमंत कोकाटे यांनी महात्‍मा ज्‍योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्‍या जिवन चरित्रावर व्‍याख्‍यान दिले त्‍यानंतर उपस्थित सर्व मान्‍यवरांची भाषणे झालीत तदनंतर मा.श्री.हेमंत मावळे यांनी महात्मा फुले यांच्‍या जीवनावर पोवाड्याच्‍या कार्यक्रमाचे सादरीकरण करून प्रेक्षकाना 19व्या शतकात नेऊन प्रबोधन केले व त्‍यासोबत महाराष्‍ट्र गीताचे गायनही केले. त्‍यानंतर मा.आमदार सुनिल कांबळे, पुणे लष्‍कर विधानसभा मतदार संघ यांचे अध्‍यक्षीय भाषण पार पडले.
यावेळी मा.श्री.संदिपसिंग गील पोलीस उपायुक्‍त पुणे शहर, मा. श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍हा परिषद पुणे, मा. श्री.दिनेश डोके संचालक इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग म.रा पुणे, मा. श्रीम.स्‍नेहा किसवे देवकाते उपजिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुणे, मा. श्री.खुशाल गायकवाड, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्‍याण (प्रादेशिक) विभाग पुणे, मा. श्रीम.संगिता डावखर, सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण पुणे, मा. श्री.प्रविण कोरगंटीवार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी व मा. श्रीम.राधिका बारटक्‍के तहसिलदार पुणे शहर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास पुणे जिल्‍ह्यातील महाविद्यालयांमधील समान संधी केंद्रातील प्रतिनिधी देखील मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
या जयंती निमित्त महात्मा फुले यांनी दलीत लोकांसाठी विहीर खुली केली हा देखवा सोमनाथ आर्ट ने थ्री डी रांगोळी काडून लोकांना चांगलेच आकर्षित केले होते.
शेवटी श्रीम. शितल बंडगर प्रकल्‍प अधिकारी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी बंधूंनी व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मोठी मदत केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *