पुरुषांना पोटगीचा अधिकार नाही काय?:डॉ नंदकिशोर मैंदळकर*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*चंद्रपूर*: पती-पत्नी संसाराची दोन चाके आहेत एक जरी निखळला की संसाराचा गाडा जमिनीत रुततो व संसाराला खीळ बसतो. दोष पत्नीचा असो वा पतीचा पत्नी कमावती असो वा नसो पत्नीच्या मागणीप्रमाणे तिला पोरगी देण्यास न्यायालय सांगतात. कायदा पती पत्नी दोघांनाही समान असावा.पत्नी कमावती असेल व पुरुष कमावता नसल्यास किंवा कमावण्यासाठी असमर्थ असल्यास त्याला पोटगीचा अधिकार नाही काय? भारतीय परिवार बचाव संघटने कडूंन एक दिवशीय चर्चासत्र घेण्यात आले त्यात हुंडाबळी 498(अ), गृह हिंसाचार 2005, पोटगी, वैवाहिक बलात्कार, कस्टडी (मुलांचा ताबा) तलाक, कार्यस्थळी उत्पिडन,मिटू यासारख्या विषयावर चर्चा दीर्घ झाली. यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, कायदेविषयक सल्लागार सारिका संदुरकर, ॲड नितीन घाटकीने, सुदर्शन नैताम, मोहन मोहन जिवतोडे, वसंता भलमे, प्रदीप गोविंदवार,प्रशांत मडावी, भावना रोडे, किरण चौधरी(गडचिरोली), रेखा चौधरी, सचिन बरबटकर, गंगाधर गुरणुले उपस्थित होते. एक दिवशीय चर्चासत्रात अनेक पत्नी पीडितांनी आपली हजेरी लावली अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. दुःखाला वाचा फोडल्या. अश्रूंना वाटा मोकळ्या करून दिल्या. पत्नीला जसे पोटगीचा अधिकार आहे त्याचप्रमाणे पत्नी पीडित व न कमावत्या पुरुषाला कमावत्या पत्नीकडून मागणीचा अधिकार नाही काय?पोटगीची मागणी करण्यास काही हरकत नसावी. पुरुषांनो पत्नीकडून अत्याचार होत असल्यास रीतसर भरोसा सेल ला रिपोर्ट करावे अत्याचाराच्या हुंडाबळी 498(अ)वैवाहिक बलात्काराच्या खोट्या तक्रारी देऊन पत्नी पुरुषाला खोट्या केसेस मध्ये मोठ्या प्रमाणात अडकित आहेत मग आपली बाजू खरी असल्यावरही रिपोर्ट देण्यात तुम्ही काय घाबरता आता लाजू नका समोर या पुरुषांनो संसार वाचवायचा असेल तर अन्यायाला वाचा फोडा अन्यायाला घाबरू नका.N C R B च्या सर्वेनुसार 92 हजार पुरुष दरवर्षी आत्महत्या करीत आहेत आत्महत्या करणे हा पर्याय नव्हे त्याकरिता लढाई लढा. अन्यायाविरोधात तक्रार करते व्हा. तक्रार करणे म्हणजे वैर करणे नव्हे त्यात समुपदेशनातूनही मार्ग निघतात मनातील क्लेश मध्यस्थ मार्फत दूर होतात पुरुषांनो हिम्मत हरू नका संघटना पण आपल्या पाठीशी आहे. कुटुंब सुरक्षित असेल तर समाज व देश सुरक्षित राहील अथवा सर्व नश्वर. म्हणून आपले कुटुंब वाचविणे हा मुख्य उद्देश असावा. यातच आपले सौख्य सामावलेले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *