माता हिंगुलांबिका प्रकट दिन हर्शोलासात साजरा*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*चंद्रपूर*:-भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर व भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर. यांनी फाल्गुन वद्य त्रयोदशीला माता हिंगुलांबिका प्रकट दिन मोठ्या हर्शोलासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अभिलाषा मैंदळकर.प्रीती लखदिवे. आरती गोजे. एकता बर्डे. जयश्री गोजे. वंदना सुत्रावे आस्था गोजे.संध्या मैंदळकर.पायल बर्डे.प्रगती सरगे.वृंदा दखणे.अनिल गोजे. अमोल बर्डे. बबन धनेवार. आदी उपस्थित होते. माता हिंगुलांबिका मंदिराला दिव्याची रोषणाई करण्यात आली. मंदिर हार फुलांनी सजविण्यात आले. मातेला पारंपरिक साज चढविण्यात आला मातेची मनोभावे आराधना करण्यात आली. महाआरती हर्शोलासात करण्यात आली व त्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रकट दिनाकरिता भावसार समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते करीता अनेकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here